Mahindra Car: ऑटो सेक्टर मधील काही नामांकित कंपन्यांचे नाव घ्यायचे ठरले तर त्यात महिंद्रा कंपनीचा हमखास उल्लेख करावा लागतो.

अशातच जर तुम्हीही खूप दिवसांपासून नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही सर्वोत्तम कारच्या शोधात असाल, तर आज आम्ही तुम्हाला Mahindra बोलेरो बाबत माहिती देणार आहोत.

महिंद्रा लवकरच पुढील जनरेशनची स्कॉर्पिओ लॉन्च करणार आहे. लॉन्चच्या अगोदर, कंपनीने नवीन स्कॉर्पिओ (कोडनेम Z101) चा टीझर व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

कंपनी जूनमध्ये नवीन स्कॉर्पिओ लाँच करू शकते. महिंद्राने नवीन पिढीच्या स्कॉर्पिओला एसयूव्हीचे ‘बिग डॅडी’ म्हणून संबोधले आहे. समोरची लोखंडी जाळी पूर्णपणे रीडिझाइन करण्यात आली आहे.

यात सी-आकाराचे एलईडी डीआरएल, ड्युअल-टोन अलॉय व्हील, ड्युअल-बीम एलईडी हेडलाइट्स आणि क्रोम इन्सर्ट मिळतात.

नवीन SUV ला कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, रूफ-माउंट स्पीकर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि सनरूफ देखील मिळते. 2-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन पर्याय असतील.

या वाहनाची किंमत 10 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन स्कॉर्पिओ 6- किंवा 7-सीटर पर्यायासह ऑफर केली जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ स्टिंग किंवा महिंद्रा स्कॉर्पिओ या नावाने बाजारात आणली जाऊ शकते. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओसह विद्यमान मॉडेलची विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा प्रकारे महिंद्रा आपले सर्वाधिक विक्रीचे आणि लोकांच्या पसंतीस पडणारे मॉडेल नवीन स्वरूपात आणून ग्राहकांना एक आपली नविन वाहने खरेदी करण्याची संधी देणार आहेत. ग्राहकदेखील महिंद्रा स्कॉर्पिची आतुरतेने वाट पाहत आहेत.