शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- केंद्र सरकारला एनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षात सर्वांत जास्त आत्महत्यांचा आकडा माहाराष्ट्रात आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 2680 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

2017 मध्ये ही संख्या 2426 होती. कर्नाटक दुस-या क्रमांकावर आहे, तिथे 2019 मध्ये 1331 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेलंगणामध्ये 2019 मध्ये 491 आणि 2017 मध्ये 846 शेतक-यांनी आत्महत्या केल्या.

कर्जामुळे आत्महत्या :- केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी एनसीआरबीनं 2019 पर्यंतचा अहवाल प्रसिद्ध केल्याची माहिती दिली. त्या अहवालात 2017 ते 2019 पर्यंतच्या घटनांची माहिती आहे. या अहवालात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची माहिती देण्यात आलेली नाही. कर्जाच्या बोजाखाली दबल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

विविध राज्यातील शेतकरी आत्महत्या :- पंजाबमध्ये 2019 मध्ये 239 आणि 2017 मध्ये 243 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मध्य प्रदेशात 2019 मध्ये 142 आणि 2017 मध्ये 429 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. आंध्र प्रदेशात, 2019 मध्ये 628 आणि 2017 मध्ये 375 शेतक-यांनी आपले जीवन संपवले. सरकारच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये देशभरात 5955 शेतक-यांनी आत्महत्या केल्या, 2018 मध्ये 5763 आणि 2019 मध्ये 5957 शेतक-यांनी आत्महत्या केली.

सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं ? :- शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारनं काय केलं, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. जे शेतकरी कर्ज परतफेड करण्यास सक्षम नाहीत, त्यांच्यासाठी काय करत असल्याचं विचारलं होतं. त्यावर तोमर यांनी 2008-09 मध्ये कर्जमाफी करण्यात आली होती, अशी माहिती दिली. त्या वेळी 3.73 कोटी शेतकऱ्यांच्या 52 हजार 259 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker