LPG Price Hike
LPG Price Hike

MHLive24 टीम, 22 मार्च 2022 :- LPG Price Hike : साधारणतः भारतात प्रत्येक घरात एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. दिवसेंदिवस भारतात हा वापर वाढतच आहे. यामुळे LPG सिलिंडर प्रत्येकाच्या बजेटचा भाग असतो. त्यामुळे सिलिंडर किती महाग झाला की स्वस्त झाला हे जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. दरम्यान तब्बल पाच महिन्यांनंतर तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.

6 ऑक्टोबर 2021 नंतर पहिल्यांदाच LPG गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवार 22 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली आहे.

तर कोलकातामध्ये ग्राहकांना सिलिंडरसाठी 976 रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरची किंमत 965.50 रुपये होती, तर आता तुम्हाला 987.50 रुपये मोजावे लागतील.

19 किलो LPG सिलेंडरच्या किमतीत 58 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दिल्लीत त्याची किंमत 1954.50 रुपये प्रति सिलेंडरवर गेली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले

तब्बल 137 दिवसांनंतर आज 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर डिझेलही प्रतिलिटर 78 पैशांनी महागले आहे. मंगळवारी दिल्लीतील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रति लिटरवर पोहोचला, तर डिझेलही 87.47 रुपयांवर पोहोचले.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup