LPG Price Hike : साधारणतः भारतात प्रत्येक घरात एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. दिवसेंदिवस भारतात हा वापर वाढतच आहे. यामुळे LPG सिलिंडर प्रत्येकाच्या बजेटचा भाग असतो. त्यामुळे सिलिंडर किती महाग झाला की स्वस्त झाला हे जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. दरम्यान तब्बल पाच महिन्यांनंतर तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.

वास्तविक मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दुसरा झटका बसला आहे. घरगुती सिलिंडर पुन्हा एकदा महाग झाला आहे. त्याचवेळी, आजपासून म्हणजेच 19 मे 2022 पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत.

या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. 7 मे रोजी पहिल्यांदाच 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि आजही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलसोबतच खाण्यापिण्याच्या किमतीमुळे त्रस्त झालेले नागरिकही एलपीजीच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झाले आहेत. नुकतेच 7 मे रोजी घरगुती एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागले. त्यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली असली तरी दिल्ली मात्र मागे राहिले. आज घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 3 रुपये 50 पैशांनी वाढले तेव्हा ही तफावत पुसली गेली.

आता संपूर्ण देशात घरगुती एलपीजी सिलिंडर 1000 च्या पुढे आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे. आजपासून, 14.2 किलोचा घरगुती LPG सिलेंडर दिल्ली आणि मुंबईमध्ये 1003 रुपयांना आणि कोलकात्यात 1029 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांना मिळेल.

व्यावसायिक सिलेंडर खूप महाग 7 मे रोजी एलपीजीच्या दरात झालेल्या बदलामुळे जिथे घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला, तिथे 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. आज त्याचा दर 100 रुपयांनी वाढला आहे. आता 19 किलोचा सिलेंडर दिल्लीत 2354, कोलकात्यात 2454, मुंबईत 2306 आणि चेन्नईमध्ये 2507 रुपयांना विकला जात आहे.

1 मे रोजी त्यात सुमारे 100 रुपयांची वाढ झाली होती. त्याच वेळी, मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ 2012 रुपये होती. 1 एप्रिलला ते 2253 वर आणि 1 मे रोजी 2355 रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षभरात व्यावसायिक सिलिंडरचे दर 750 रुपयांनी वाढले आहेत.