LPG Gas Cylinder Price : 1 जूनची सकाळ मोठी बातमी घेऊन आली आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरही स्वस्त झाले आहेत. 1 जून रोजी इंडियन ऑइलने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती (LPG Gas Cylinder Price Today) तब्बल 135 रुपयांनी कमी केली आहेत.

स्वस्त सिलिंडर कुठे मिळणार?

19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आजपासून म्हणजेच 1 जूनपासून 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दिल्लीत आता 19 किलोचा सिलेंडर 2354 ऐवजी 2219 रुपयांना मिळणार आहे.
कोलकातामध्ये 2454 ऐवजी 2322 रुपयांना मिळणार आहे.
मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 रुपये मिळतील.
चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 19 किलोचा सिलिंडर 2373 रुपयांना मिळणार आहे.

१ मे रोजी दर वाढविण्यात आले
कंपन्यांनी दिलेल्या या सवलतीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल. याआधी 1 मे रोजी 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

त्याचवेळी मे महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर दोनदा वाढवण्यात आले होते. 7 मे रोजी घरगुती सिलिंडरचे दर (एलपीजी सिलेंडर किंमत) 50 रुपयांनी वाढले होते. त्याच वेळी, 19 मे रोजी 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, सध्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

200 रुपये अनुदान मिळेल
१ जूनपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पण, काही दिवसांपूर्वीच जनतेला मोठा दिलासा देत सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत 200 रुपये प्रति सिलेंडर गॅस सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला १२ सिलिंडरवर मिळणार आहे.