साधारणतः भारतात प्रत्येक घरात एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. दिवसेंदिवस भारतात हा वापर वाढतच आहे. यामुळे LPG सिलिंडर प्रत्येकाच्या बजेटचा भाग असतो.

त्यामुळे सिलिंडर किती महाग झाला की स्वस्त झाला हे जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. अशातच महागाईतून दिलासा मिळण्याच्या आशेवर असलेल्या लोकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.

LPG सिलिंडरच्या किमतीत आज म्हणजेच 1 मे रोजी 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर ही वाढ झाली आहे.

सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तुम्हाला सांगतो, गेल्या महिन्यात म्हणजे 1 एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 250 रुपयांनी वाढल्या होत्या.

19 किलोचा एलपीजी सिलिंडर महागला IOC नुसार, आज दिल्लीत 19 किलोचा LPG सिलेंडर रिफिल करायचा असेल तर तुम्हाला 2355.50 रुपये द्यावे लागतील.

30 एप्रिलपर्यंत केवळ 2253 रुपये खर्च करायचे होते. त्याचबरोबर कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

1 मे रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत

मुंबई – रु. 949.50

दिल्ली – रु. 949.50

कोलकाता – रु. 976

चेन्नई – रु. 965.50

1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि 22 मार्च रोजी 9 रुपयांनी स्वस्त झाली होती. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरची किंमत 170 रुपयांनी वाढली आहे.

1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती. नोव्हेंबर 2021 मध्ये ते 2000 झाले आणि डिसेंबर 2021 मध्ये 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 ला ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी तो 2253 रुपयांवर पोहोचला होता