LPG Gas
LPG Gas

LPG Cylinder : साधारणतः भारतात प्रत्येक घरात एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. दिवसेंदिवस भारतात हा वापर वाढतच आहे. यामुळे LPG सिलिंडर प्रत्येकाच्या बजेटचा भाग असतो.

त्यामुळे सिलिंडर किती महाग झाला की स्वस्त झाला हे जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. अशातच महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.

आजपासून स्वयंपाक करणे महाग झाले आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Price) 1 रुपयांनी वाढली आहे.

या वाढीनंतर आता दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच शनिवार 7 मे 2022 पासून लागू झाली आहे.

याआधी मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

इतर शहरांच्या दरात या वाढीनंतर पाटणामध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1089.5 रुपये झाला आहे. त्याचवेळी लखनऊमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 1037.5 रुपये झाला आहे.

पंजाबमध्ये त्याची किंमत 1035 रुपयांवर गेली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

22 मार्च रोजी, अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर ₹ 50 ने वाढले. यापूर्वी 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

स्थानिक करांमुळे घरगुती एलपीजीच्या किमती राज्यानुसार बदलतात. इंधन किरकोळ विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारतात. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असतात.