काही मिनिटातच घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा

MhLive24 टीम , 24 जुलै  2020 :- विविध अनुदान मिळण्यासाठी किंवा अनेक योजना मिळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. या आधार कार्डला आपला मोबाइलनंबर लिंक असणे आवश्यक आहे.

परंतु बऱ्याचदा हे लिंक करण्यासाठी संबंधित कार्यालयात गर्दी असते किंवा अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र आता आधारसाठी तुम्हाला कुठे अर्ज करावा लागत नाही. तर तुम्ही आधारसाठीचा मोबाईल नंबर अपडेट घर बसल्या करू शकता.

सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल नंबरवरून 14546 वर कॉल करा. आता भारतीय किंवा एनआरआय या पर्यायाची निवड करा. यानंतर 1 आकडा दाबून तुमच्या फोन नंबरशी आधार कार्ड लिंक करण्याची परवानगी द्या.

Advertisement

त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 आकडी आधार नंबर नोंदवाव लागेल आणि 1 दाबून आधार नंबर पूर्ण नोंदविल्याची खात्री करावी लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर नोंदवावा लागणार आहे.

UIDAI च्या डेटाबेसमधून तुमचे नाव, फोटो आणि जन्म तिथी घेण्यासाठी ऑपरेटरला परवानगी देण्यास सांगितले जाईल. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे ओटीपी मिळेल. त्याची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमचा नवीन नंबर आधारला लिंक होईल.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker