दररोज 50 रुपयांपेक्षा कमी खर्चात एलआयसी तुम्हाला देईल 25 लाखांचा लाभ

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या अशा पॉलिसी बद्दल सांगणार आहोत, ज्यात पॉलिसी मुदतीच्या शेवटी मॅच्युरिटी बेनिफिट उपलब्ध आहे आणि टर्म इन्शुरन्स सारखे लाइफ टाइम साठी विमा सम एश्योर्ड कव्हरेज देखील आहे. ( LIC’s Jeevan Anand Policy )  

ज्यांना असे वाटते की, त्यांना मैच्योरिटी लाभ मिळावा आणि नामनिर्देशित व्यक्तीला मृत्यूनंतर लाभ मिळावा, त्यांच्यासाठी हे एक उत्तम पॉलिसी ठरू शकते. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही खूप कमी प्रीमियममध्ये 25 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता.

जीवन आनंद पॉलिसी :- एलआयसीच्या ज्या पॉलिसीबद्दल आपण पाहणार आहोत ती म्हणजे जीवन आनंद पॉलिसी. त्याचा टेबल नंबर 915 आहे. या पॉलिसीसाठी प्रीमियम टर्म आणि पॉलिसी टर्म समान आहेत. याचा अर्थ, पॉलिसी जितके वर्षे लागू आहे, तितके वर्ष प्रीमियम भरावा लागेल.

Advertisement

दोन प्रकारच्या बोनसचा मिळतो लाभ :- या पॉलिसीसोबत दोन प्रकारच्या बोनसचा लाभ मिळतो. पॉलिसी जितकी जुनी असेल तितका वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनसचा लाभ जास्त मिळेल. फायनल अॅडिशनल बोनसचा लाभ घेण्यासाठी पॉलिसी १५ वर्षे जुनी असणे गरजेचे आहे. डेथ बेनिफिटसंदर्भात जर पॉलिसीच्या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर सम अश्युअर्डच्या १२५ टक्के डेथ बेनिफिट मिळतो.

मॅच्युरिटीच्या वेळेस सम अश्युअर्ड बोनससोबत मिळतो. त्यानंतर जेव्हा पॉलिसीधारकाचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या कुटुंबाला सम अश्युअर्डइतकी रक्कम पुन्हा मिळेल. ही पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षांनी कर्जाची सुविधा उपलब्ध होते.

मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारा लाभ :- समजा जर सुरेशचे वय ३५ वर्षे आहे आणि त्याने ५ लाखांचा सम अश्युअर्ड घेतला आहे आणि पॉलिसी ३५ वर्षांची आहे. तर एलआयसीच्या प्रिमियम कॅल्क्युलेटरनुसार त्याचा वार्षिक प्रिमियम १६,३०० रुपये असेल. सहामाही प्रिमिय ८,२०० रुपये, तिमाही प्रिमियम ४,२०० रुपये आणि दरमहा प्रिमियम १,४०० रुपये असेल.

Advertisement

३५ वर्षांमध्ये त्याची एकूण जमा रक्कम ५.७० लाख रुपये असेल. सध्या एलआयसीने ज्या दराने बोनस जाहीर केला आहे त्या दराने सुरेशला मॅच्युरिटीच्या वेळेस एकूण २५ लाख रुपये मिळतील. यामध्ये बेसिक सम अश्युअर्ड ५ लाख, ८.६० लाख रुपये वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस आणि ११.५० लाख रुपये फायनल अॅडिशनल बोनस असेल. जेव्हा सुरेशचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या नॉमिनीला ५ लाख रुपये पुन्हा मिळतील.

जीवन आनंद पॉलिसीची वैशिष्ट्ये

या योजनेमध्ये 25 वर्षाच्या कालावधीनंतर परतावा मिळतो
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे आणि त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
या पॉलिसीत गुंतवणूक आणि विमा असे दोन्ही फायदे मिळतात
या पॉलिसीनुसार संबंधित व्यक्तीला किमान एक लाख रुपये मिळण्याची हमी आहे.
या पॉलिसीत कमाल रक्कमेसाठी कोणतीही मर्यादा नाही
जीवन आनंद पॉलिसीसाठी 15 ते 35 वर्षे मुदत ठरवण्यात आली आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker