LIC Policy : एलआयसीची ‘ही’ जबरदस्त स्कीम; अवघ्या 100 रुपयांत मिळेल 75000 रुपये अन मुलांना स्कॉलरशिप

MHLive24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- विमा म्हणजे इन्श्युरन्स मग तो जीवनाचा असो की आजारपणाचा, सध्या काळाची गरज बनला आहे. मनुष्य गरीब असो की श्रीमंत, कोरोना काळाने इन्श्युरन्सचे महत्व चांगल्या प्रकारे समजावले आहे. भारत सरकारने गरिबांसाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत.(LIC Policy)

या योजना आणि योजनांचा उद्देश गरीबांच्या जीवनात समृद्धी आणणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देणे हा आहे. गरीब लोकांचे हित लक्षात घेऊन जीवन विमा महामंडळाने आम आदमी बीमा योजना सुरू केली. या कार्यक्रमांतर्गत विमाधारकास बरेच फायदे मिळतात.

जाणून घ्या या योजनेचे फायदे

Advertisement

या योजनेंतर्गत लाभार्थ्याला एकाच वेळी 5 लाभ मिळतात.

1. जर अर्जदाराचा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला, तर या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला 30,000 रुपये दिले जातात.
2. जर प्लॅन घेणार्‍या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला 75,000 रुपये दिले जातात.
3. कुटुंब प्रमुख अपघातात शारीरिकदृष्ट्या अपंग झाल्यास त्याला 75,000 रुपये दिले जातील.
4. योजना घेणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अपंग झाली तर त्याला 37,500 रुपये दिले जातील.
5. पाचव्या लाभाअंतर्गत, योजना घेणाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील दोन मुलांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.

मुलांना शिष्यवृत्ती देखील मिळते

Advertisement

या विमा योजनेंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर मुलांना शिष्यवृत्ती देखील मिळते. ही एक एड-ऑन सर्विस आहे. याअंतर्गत दोन मुलांना (9-12 मध्ये शिकणार्‍या ) दरमहा 100-100 रुपये मिळतील. जर विमाधारकास काही अपघात झाला तर एलआयसी लाभार्थ्यांना एनईएफटीमार्फत किंवा अकाउंट क्रेडिट द्वारे या योजनेचा लाभ दिला जाईल.

कुटुंबातील केवळ एका सदस्याला कवर

या योजनेत कुटुंबातील केवळ एका व्यक्तीचा समावेश होऊ शकतो. विमाधारकाचे वय 18-59 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली असणे महत्वाचे आहे. या अंतर्गत 48 व्यवसाय ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत. या योजनेत सामील असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

Advertisement

फक्त 100 रुपये प्रीमियम

प्रीमियमबद्दल सांगायचे तर त्यासाठीचे वार्षिक प्रीमियम फक्त 200 रुपये आहे. यापैकी सरकार 100 रुपये जमा करते आणि विमाधारकास 100 रुपये जमा करावे लागतात. जर विमाधारक ग्रामीण भागाचा असेल आणि त्यांच्याकडे जमीन नसेल तर त्याला 100 रुपयेही द्यावे लागणार नाहीत.

केवळ तीन कॅटेगिरीतील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. प्रथम, ते दारिद्र्य रेषेच्या खाली असावे, त्यास 50 टक्के म्हणजे 100 रुपये द्यावे लागतील. दुसरा ग्रामीण भागातील असून त्याच्या मालकीची जमीन नसावी आणि बीडी कामगार, सुतार, मच्छीमार, हस्तकला आदी 48 व्यवसाय ग्रुपमधील असावा.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker