LIC ने करोडो ग्राहकांना पाठवला ‘हा’ मॅसेज, दुर्लक्ष कराल तर पैशांसंदर्भात पस्तवाल

MHLive24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या भारतीय जीवन विमा महामंडळानं आपल्या करोडो पॉलिसीधारकांना एक संदेश पाठवलाय. एलआयसीनं ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये म्हटलंय, की पीएमएलएनुसार 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटसाठी पॅन लिंक आवश्यक आहे.(LIC’s alert message )

म्हणून, पॉलिसीधारकाने ताबडतोब त्याच्या एलआयसी पॉलिसीमध्ये पॅन कार्ड लिंक करुन घ्यावे, असं नमूद केलंय. आजकाल अनेक महत्वाची कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी जोडली जात आहेत. एलआयसीने पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

एलआयसीने म्हटले आहे की पॅन पॉलिसीशी जोडण्याचे अनेक फायदे आहेत. पॅन कार्डला एलआयसी पॉलिसीशी जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपल्याला यात जास्त काही करण्याची गरज नाही. एलआयसी आता थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करते.

Advertisement

जर तुमची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर पॉलिसी पॅन कार्डशी जोडलेली नसेल तर पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण येईल. म्हणून, असा त्रास टाळण्यासाठी, तुमची पॉलिसी आजच पॅनशी जोडा.

असे होईल लिंक

जर तुम्ही कोणतीही LIC पॉलिसी घेतली असेल आणि ती अजून पॅनशी जोडलेली नसेल तर तुम्ही घरी बसून ऑनलाईन करू शकता. ते कसे करावे ते जाणून घेऊया.

Advertisement

1. सर्वप्रथम तुम्हाला LIC च्या अधिकृत साइटवर जावे लागेल (https://licindia.in/Home/Online-PAN-Registration).
2. येथे तुम्हाला ऑनलाईन पॅन नोंदणीवर क्लिक करावे लागेल.
3. एलआयसीच्या साइटवर पॉलिसींच्या सूचीसह पॅन तपशील प्रदान करा.
4. आता तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या मोबाइल क्रमांकावर LIC कडून एक OTP येईल, तो प्रविष्ट करा.
5. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक यशस्वी नोंदणी विनंती संदेश मिळेल.
6. आता तुम्हाला कळेल की तुमचे पॅन पॉलिसीशी जोडलेले आहे

असा चेक करा अर्जाचा स्टेट्स

एलआयसी पॉलिसीला पॅनशी जोडण्यास थोडा वेळ लागतो. या दरम्यान आपण त्याचा स्टेट्स तपासू शकता. स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला LIC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन चेकिंग पॉलिसी पॅन स्टेटस वर क्लिक करून तुमची माहिती भरावी लागेल. या प्रक्रियेसह, तुम्ही तुमच्या पॉलिसीची स्थिती सहज ट्रॅक करू शकता.

Advertisement

LIC च्या वेबसाईटवर आपण घरी बसून अनेक गोष्टी करू शकतो. तुम्ही LIC पॉलिसीची स्थिती सहज तपासू शकता. यासाठी नोंदणी कोणत्याही शुल्काशिवाय करावी लागते. याशिवाय, तुम्हाला काही माहिती हवी असल्यास, तुम्ही 022 6827 6827 वर कॉल करून 9222492224 वर LICHELP <पॉलिसी नंबर> लिहून संदेश पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker