LIC Policy for children’s education: LIC च्या ‘ह्या’ खास योजनेत गुंतवा पैसे, मुलांच्या उच्चशिक्षणाच्या खर्चाची चिंताच मिटेल

MHLive24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालक प्रयत्न करत असतात. यासाठी भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी)ने एक योजना सुरू केली आहे.(LIC Policy for children’s education)

जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तर एलआयसीची ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’ पॉलिसी एक उत्तम पर्याय आहे.

एलआयसीने बालदिनानिमित्त न्यू चिल्ड्रन्स मनी बँक प्लॅन योजना सुरू केली होती. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने ही विमा योजना तयार करण्यात आली आहे.

Advertisement

ही विमा योजना घेण्यासाठी कमीत कमी वय 0 वर्ष तर जास्ती जास्त वय 12 वर्ष इतकं आहे. कमीत कमी 10 हजार रुपायांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

आपण ही पॉलिसी कधी घेऊ शकता?

आपण आपल्या मुलासाठी न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक योजना घेऊ इच्छित असाल तर मुलाच्या जन्माच्या वेळी ते घेणे चांगले. मूल 12 वर्षाचे होईपर्यंत आपण ते घेऊ शकता. या पॉलिसीची मॅच्युरिटी 25 वर्षे आहे. उच्च शिक्षणासाठी ही योजना सर्वोत्तम मानली जाते. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रोफेशनल स्टडीज साठी पैशांची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याकडे भरपूर फंड जमा झालेला असेल.

Advertisement

कशी घ्यावी ही पॉलिसी?

एलआयसीच्या मते, न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक पॉलिसीसाठी आपल्याला एलआयसीच्या वेबसाइटवर जावे लागेल. तिथून आपल्याला एक फॉर्म मिळेल, जो डाउनलोड करुन भरावा लागेल. तथापि, फॉर्म सबमिट करण्यासाठी, एकतर आपल्याला बँकेत जावे लागेल किंवा एलआयसीच्या एजंटकडून फॉर्म भरावा लागेल.

आपण अर्ज करता तेव्हा मुलाचे आणि पालकांचे आधार कार्ड आवश्यक असते. तसेच अ‍ॅड्रेस प्रूफ, पासपोर्ट साईजची छायाचित्रेही लागतील. किमान विम्याची रक्कम एक लाख रुपये आहे, परंतु जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही.

Advertisement

या योजनेचा काय फायदा होईल?

या योजनेत, मूल 18 वर्ष, 20 वर्षे आणि 22 वर्षांचे असेल तेव्हा विम्याच्या मूलभूत रकमेपैकी 20-20% रक्कम दिली जाते. उर्वरित 40 टक्के रक्कम मुलाने 25 वर्षानंतर दिली जाते. जर व्यवस्थित पाहिले तर दररोज फक्त 150 रुपये वाचवून आपण 19 लाखांपर्यंत रक्कम मिळवू शकता. या योजनेत बोनस देखील उपलब्ध आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker