LIC IPO
LIC IPO

सध्या LIC IPO बाबत आपण महत्वाची घडामोड घडत आहे. गुंतवणुकदार LIC IPO कडे लक्ष ठेवून आहेत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या IPO ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

LIC IPO बद्दल मोठी बातमी समोर आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला देखील स्वारस्य असेल तर आमची बातमी नक्की वाचा. वास्तविक देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मधून सरकार 30,000 कोटी रुपये उभारणार आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, मागील अंदाजापेक्षा हे सुमारे 40 टक्के कमी आहे. या बदल्यात सरकार 5 टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे.

या संदर्भात, एलआयसीचे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी LIC मधील 7 टक्के हिस्सेदारी विकून 50,000 कोटी रुपये उभारण्याचा अंदाज होता.

मार्चमध्ये लॉन्चिंग: LIC चा IPO मार्चमध्ये लॉन्च होणार होता परंतु रशिया- युक्रेन संकटामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आली. अशा स्थितीत केंद्र सरकारने काही दिवसांसाठी स्थगिती दिली. आता बाजारातील परिस्थिती सामान्य दिसू लागल्याने सरकार IPO लॉन्च करण्याची तारीख जाहीर करू शकते.

12 मे पर्यंत संधी: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता IPO लाँच करण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ आहे. याचा अर्थ असा की सरकारला 12 मे पूर्वी IPO लाँच करावा लागेल.

पॉलिसीधारक आणि LIC कर्मचाऱ्यांना LIC च्या IPO मध्ये सूट दिली जाईल. मात्र किती याचा खुलासा झाला नाही. नियमांनुसार, इश्यू आकाराच्या 5 टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांसाठी आणि 10 टक्क्यांपर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवता येते. चालू आर्थिक वर्षात, सरकारला आतापर्यंत OFS, कर्मचारी OFS, धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि बायबॅक द्वारे 12,423.67 कोटी रुपये मिळाले आहेत.