MHLive24 टीम, 11 मार्च 2022 :- भारत सरकार LIC IPO साठी तब्बल दोन वर्षांपासून तयारी करत आहे. याकाळात IPO बाबत विविध चर्चा घडून आल्या, अशा परिस्थितीमध्ये आता मार्चमध्ये IPO मार्केटमध्ये दाखल होणार अशी चर्चा असतानाच रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकामुळे अनिश्चितता निर्माण झालेली आहे.
दरम्यान आता नवीन माहितीनुसार लवकरच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) लवकरच त्यांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. IPO च्या आधी LIC ने मोठी बातमी दिली आहे.
LIC ने डिसेंबर 2021 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत LIC चा नफा वाढून 235 कोटी रुपये झाला आहे. यामुळे गेल्या वर्षी याच कालावधीत एलआयसीला केवळ 94 लाख रुपयांचा नफा झाला होता.
9 महिन्यांत रु. 16438 कोटीचा नफा
LIC चा डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी निव्वळ नफा रु. 16438 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत रु. 7 कोटी होता. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत गोळा केलेला एकूण प्रीमियम 97,761 कोटी रुपये होता जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 97,008 कोटी रुपये होता. तिसर्या तिमाहीत पहिल्या वर्षाचा प्रीमियम वार्षिक 10 टक्क्यांनी वाढून 8,748 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 7,957 कोटी रुपये होते.
सध्याची परिस्थिती पाहता, सरकार IPO ला विलंब करू शकते
भांडवली बाजार नियामक सेबीने अलीकडेच LIC च्या सुमारे 63,000 कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) ला मान्यता दिली आहे. तथापि, रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकार काही विलंबाने एलआयसीचा आयपीओ आणण्याचा विचार करत आहे.
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सरकारला एलआयसीमधील ५ टक्के हिस्सा विकायचा आहे. ऑफर दस्तऐवजानुसार, कोणत्याही नवीन इक्विटी इश्यूशिवाय. IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर असेल.
- 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
- 🤷🏻♀️ Mhlive24 आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit