LIC’s Dhan Rekha Policy : LIC ने आणली नवीन ‘धन रेखा’ पॉलिसी! जाणून घ्या जबरदस्त फायदे

MHLive24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC वेळोवेळी ग्राहकांसाठी उत्तम योजना आणत असते. LIC ही देशातील अशा विमा कंपन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये जोखीम न घेता गुंतवणूक करता येते, म्हणजेच येथे केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.(LIC’s Dhan Rekha Policy )

यामध्ये लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत यात स्कीम असतात. वास्तविक ही कंपनी सरकार चालवते. आता LIC ने एक जबरदस्त योजना आणली आहे. या योजनेबद्दल जाणून घेऊया.

धन रेखा विमा पॉलिसी

Advertisement

एलआयसीने सांगितले की, या विमा पॉलिसीचे नाव ‘धन रेखा’ आहे. यामध्ये, पॉलिसी चालू स्थितीत असल्यास, विमा रकमेचा एक निश्चित भाग नियमित अंतराने सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून दिला जाईल. म्हणजेच ही योजना तुम्हाला प्रचंड फायदे देणार आहे.

पॉलिसीसाठी पात्रता काय आहे?

या पॉलिसीचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला आधीच मिळालेली रक्कम वजा न करता संपूर्ण विमा रक्कम दिली जाईल. या योजनेत किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम गुंतविली जाऊ शकते.

Advertisement

कमाल रकमेवर मर्यादा नाही. त्यात गुंतवणुकीसाठी दिलेल्या अटींनुसार ते ९० दिवसांपासून ते आठ वर्षापर्यंतच्या मुलाच्या नावावर घेता येते. त्याचप्रमाणे, कमाल वयोमर्यादा देखील 35 वर्षे ते 55 वर्षे आहे.

3 टर्ममध्ये सुरू झाला प्लॅन

कंपनीने ही पॉलिसी 3 वेगवेगळ्या टर्म सह आणली आहे.
यामध्ये 20 वर्षे, 30 वर्षे आणि 40 वर्षे या तीन टर्म आहेत.
त्यातून तुम्ही कोणतीही एक टर्म निवडू शकता.
तुम्हाला मुदतीनुसार प्रीमियम रक्कम भरावी लागेल.
जर तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीची निवड केली तर तुम्हाला 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
तुम्ही 30 वर्षांची मुदत निवडल्यास, तुम्हाला 15 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
तुम्ही 40 वर्षांची मुदत निवडल्यास, तुम्हाला 20 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
याशिवाय, तुम्ही सिंगल प्रीमियम देखील भरू शकता.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker