Business Success Story : प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक कल्पना घेऊन आलो आहोत.

वास्तविक चांगल्या पगारावर IT कंपनीत काम करणाऱ्या -श्रीनिवास गौडा यांनी आपली 9 ते 5 ची नोकरी सोडून बंगळुरूमध्ये गाढवांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकातील या आयटी कर्मचाऱ्याने आता गाढवाचे दूध विकण्यास सुरुवात केली आहे.

गौडा म्हणाले की, गाढवांच्या दुःखाने आपण दुःखी आहोत आणि त्या प्राण्याचे योग्य मोल होत नाही असे वाटले. गौडा यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यात आपला डॉकी फॉर्म सुरू केला आहे. 2022 पर्यंत आयटी कंपनीत काम केलेल्या गौडा यांनी भारतात अशा प्रकारचे एक आणि कर्नाटकात पहिले डॉकी फार्मिंग आणि ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे.

श्रीनिवास गौडा यांनी त्यांच्या डोंकी फॉर्मची सुरूवात करण्यासाठी ₹40 लाखांची गुंतवणूक केली आहे. सध्या त्याच्याकडे 20 गाढवे आहेत. गाढवाचे दूध प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे आहे, असे फार्मच्या मालकाचे मत आहे. आतापर्यंत गौडा यांना 17 लाख रुपयांच्या गाढवाच्या दुधाच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.

गौडा यांनी यापूर्वी इसरी फार्म नावाचे एक काम सुरू केले होते ज्यात कृषी आणि पशुसंवर्धनासोबत पशुवैद्यकीय सेवाही पुरवल्या जात होत्या. गौडा यांनी त्यांच्या गावात 2020 मध्ये दोन-तीन एकर जागेत हे काम सुरू केले. गौडा म्हणाले, “आम्हाला प्रत्येक व्यक्तीला गाढवाचे दूध विकायचे आहे, त्याचे बरेच फायदे आहेत. आमचे स्वप्न आहे की गाढवाचे दूध देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे.

गाढवाचे दूध प्रत्यक्षात औषधाच्या सूत्रावर काम करते. ” श्रीनिवास गौडा यांनी सांगितले की, त्यांनी 8 जून रोजी हे डॉकी फार्म सुरू केले. कर्नाटकातील अशा प्रकारची ही पहिली आणि देशातील दुसरी फार्म आहे. श्रीनिवास गौडा म्हणाले की, ही फार्म सुरू करण्याबाबत त्यांनी लोकांशी संवाद साधला तेव्हा काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली, तर अनेकांनी सांगितले की ही चांगली व्यवसाय कल्पना नाही.

यानंतरही गौडा यांनी ही योजना पुढे नेण्याचा निर्णय घेतला. श्रीनिवास गौडा गाढवाच्या दुधाचे 30 मिली पॅकेट ₹150 ला विकतात.

मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटसह कर्नाटकातील अनेक शहरांमध्ये गौडाचे गाढवाचे दूध विकण्याची योजना आहे. श्रीनिवास गौडा यांनाही गाढवाचे दूध सौंदर्य उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांना विकायचे आहे.