प्रेरणादायी ! लंडनहून शिकून आली अन सुरु केला लोणच्याचा व्यवसाय; 36 महिन्यात कमावले 1 कोटी

MHLive24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- समाजात अनेक व्यक्ती अशा आहेत कि ज्या मुळातच कर्तृत्वान असतात. त्यांना नोक्रो न करत स्वतःचे ज्ञान स्वतहासाच्या प्रगती करण्यात सार्थकी लावायचे असते. बरेच लोक असे आहे की जे उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी परदेशात जातात. परंतु यालाच एक अपवाद ठरली आहे एक महिला. तिने लंडन येथून मार्केटिंगची पदवी घेतली. परंतु भारतामध्ये येऊन वडिलांचा लोणच्याचा व्यवसाय पुढे नेण्याचे ठरवले. आणि तिने यात यश मिळवत 36 महिन्यात 1 कोटी कमावले आहेत. (Learned from London and started pickle business )

निहारिका भार्गव असे या महिलेचे नाव आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून आपली पदवी घेतली आहे. त्यानंतर २०१५ मध्ये तिने लंडन येथे मार्केटिंग स्ट्रॅटेजी अॅंड एनोव्हेशनमध्ये मास्टर्ग डिग्री घेतली आहे. त्यानंतर ती भारतात परतली. निहारिकाने काही काळ नोकरी केली आणि नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

व्यवसाय सुरू करण्याआधी निहारिकाने लोणच्याच्या बाजारपेठेवर रिसर्च केले. तेव्हा तिच्या लक्षात आले की शुद्ध आणि घरगुती स्वरुपात तयार केलेल्या लोणच्याला मोठी मागणी आहे. सुरूवातीला दिल्ली आणि जवळपासच्या भागात निहारिका आपला स्टॉल चालवायची. त्यानंतर तिने लोकम मार्केटमध्ये लोणचे पुरवण्यात सुरूवात केली.

Advertisement

२०१७ मध्ये तिने द लिटल फार्म कंपनी या नावाने गुरगावमध्ये एक कंपनी सुरू केली आणि आपली उत्पादने ऑनलाईन स्वरुपात विकण्यास सुरूवात केली. असे करत तीन वर्षातच निहारिकाने आपल्या कंपनीचा टर्नओव्हर एक कोटी रुपयांपर्यत पोचवला आहे.

सध्या तिची कंपनी ५० पेक्षा जास्त प्रकारचे लोणचे विकते. या सर्वात आंब्याच्या लोणच्याची मागणी सर्वाधिक असते. त्याचबरोबर तिची कंपनी हळद, कच्चे घाण्याचे तेल, जॅम, मिरची पावडर यासारखी उत्पादनेदेखील विकते.

निहारिकाने आपल्या जिद्दीने आणि हिंमतीने स्वत:चा व्यवसाय सुरू करत इतर तरुणींसमोर एक उदाहरण ठेवले आहे. योग्य अभ्यास, रिसर्च, बाजारपेठेची समज, तंत्रज्ञानाचा वापर, आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, हिंमत आणि संयम ठेवत जर व्यवसायात काम केले तर चांगले आणि मोठे यश कमावता येते हे तिने दाखवून दिले आहे. शिवाय उत्पादन हे उत्पादन असते, त्यात लहानमोठे काहीही नसते, हे देखील तिने दाखवून दिले आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker