Benefits of mushrooms : जाणून घ्या मशरूमचे फायदे ! मशरूमचं सेवन कसं कराल ?

MHLive24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- भाज्यांमध्ये समाविष्ट मशरूम पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. मशरूमच्या वापराने भाज्यांची चव तर वाढतेच, शिवाय अनेक आरोग्य समस्यांमध्ये ही फायदा होतो. मशरूमचे फायदे, वापराची पद्धती आणि सावधगिरी याविषयी ही माहिती . . .( Benefits of mushrooms)

जर भाज्यांविषयी बोलायचं, तर मशरूम खूप लोकप्रिय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मशरूम आवडतो. मशरूम मध्ये इतर भाज्यांच्या तुलनेत अनेक पोषक घटक असतात. मशरूम मध्ये लाइसिन नावाचं अमिनो आम्ल अधिक प्रमाणात असते, जे गहू, तांदूळ इत्यादी धान्यांमध्ये याचं प्रमाण कमी असते.

हे अमिनो आम्ल माणसाच्या संतुलित भोजनासाठी अतिशय आवश्यक असते. मशरूममध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स आपला फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. हे एक नैसर्गिक अँटिबायोटिक आहे, जे मायक्रोबियल आणि अन्य बुरशीजन्य संसर्गापासून बचाव करते.

Advertisement

मशरूमचे फायदे 

हा रक्तदाबासारख्या आजाराला नियंत्रित करण्यास मदत करतो. ज्या व्यक्ती या आजाराने त्रस्त आहेत, त्यांनी मशरूमचं सेवन अवश्य करावं. यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण भरपूर असल्याने अपचन, गॅसेस, अति आम्लतेसह पोटात वेगवेगळे आजार होण्यापासून बचाव करतो. त्याचबरोबर शरीरात कोलेस्ट्रॉल आणि शर्करेचं शोषण कमी होण्यास मदत होते.

मशरूम ते सर्व देतो, जे मधुमेहींसाठी आवश्यक असते. या मध्ये जीवनसत्त्व, खनिजं, फायबर्स असतात. यामध्ये फॅट्स, कर्बोदकं, शुगर नसते, जे मधुमेहींसाठी जीवघेणे असते. यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती होते.

Advertisement

मशरूम मध्ये लीन प्रोटीन असते, जे वजन कमी करण्यास सहायक ठरते. लठुपणा कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना प्रोटीन डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये मशरूमची सेवन उत्तम मानले जाते.

मशरूम मध्ये सोडियम सॉल्ट आढळत नाही. त्यामुळे मशरूम लठ्ठपणा, किडनी आणि हृदयरुणांसाठी आदर्श आहार मानला जातो. हृदय रुगणांसाठी कोलेस्ट्रॉल, फॅट्स, सोडियम सॉल्ट सगळ्यात जास्त हानिकारक मानले जाते.

मशरूम मध्ये लोह घटक कमी प्रमाणात आढळतो, पण अल्पशा प्रमाणामुळे रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी टिकवून ठेवण्यासाठी सहायक ठरतो. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक असिड असते, जे केवळ मांसाहारी खाद्यपदार्थां मध्ये आढळते. लोह घटक आणि फॉलिक अँसिडमुळे रक्ताची कमतरता याने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम सहायक ठरतो.

Advertisement

मशरूमचं सेवन कसं कराल ?

जर तुम्ही मशरूमचं आपल्या आहारात सेवन करू इच्छित असाल, तर स्नॅक्सच्या रूपात खाऊ शकता. त्यासाठी तव्यावर थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालून शिजवा. मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतेच. म्हणून शिजवताना तो आकुंचन पावतो. हे लक्षात ठेवा, मशरूम लवकर फॅट्स शोषून घेतो. त्यामुळेच मशरूम शिजवताना नेहमी चांगल्या दर्जाचं लोणी किंवा तेल यांचा वापर करा.

जर तुम्हाला अंडं आवडत असेल, तर तुम्ही अंड्याबरोबर मशरूम खाऊ शकता. त्यासाठी अंड्यामध्ये मशरूमचे छोटे छोटे तुकडे कापून भाजून घेऊ शकता. याचा वापर तुम्ही कोणत्याही पदार्थात मिसळण्यासाठी करू शकता. म्हणजे मटार मशरूम, आलू मशरूम इत्यादी.

Advertisement

लक्षात ठेवा . . .

मशरूमचा वापर करण्यापूर्वी थोडासा तुकडा खाऊन बघा, यामुळे काही अँलजीं तर येत नाही ना, हे बघून मगच त्याचा वापर करा.

जर मशरूमविषयी तुम्हाला थोडी जरी शंका वाटत असेल, तर फेकून द्या.

Advertisement

बाजारातून नेहमी ताजे, न धुतलेले मशरूम घ्या आणि स्वतः स्वच्छ करा.

मशरूम एका पातेल्यात काढा, त्यावर थोडंसं पीठ टाका आणि थोडं पाणी शिंपडा. आता जोर न देता हाताने चोळून मशरूम स्वच्छ करा.

पिठामुळे मशरूमवर बसलेली माती निघून जाईल आणि स्वच्छ होईल. उत्तम परिणामांसाठी ही प्रक्रिया परत करा.

Advertisement

मशरूम मुळे होणारे नुकसान 

अधिक प्रमाणात मशरूमचं सेवन करण्याने अँलर्जी येते.

मशरूमचं अधिक प्रमाणात सेवन करण्याने अन्न पोट आणि आतड्यासाठी नुकसानकारक ठरते.

Advertisement

गर्भवती महिला आणि स्तनदांसाठी मशरूमचं सेवन नुकसानकारक ठरतं.

छोट्या मुलांसाठी मशरूमचं सेवन करणं नुकसानकारक ठरतं.

कच्च्या मशरूमचं सेवन करण्याने अलर्जी आणि दमा यांसारखे आजार होऊ शकतात.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker