New Bike Launched : अबब! लॉन्च झाली ‘ही’ जबरदस्त बाईक; किंमत पाहून चक्रवाल कारण या किमतीत येतील मारुतीच्या सात कार

MHLive24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- सध्या तरुणाईचे बाईक प्रेम वाढत आहे. त्यामुळे दुचाकी निर्मात्या कंपन्या नवनवीन शानदार बाईक लॉन्च करत आहेत. आता Ducati India ने नवीन Panigale V4 रेंजचे टॉप मॉडेल V4 SP लाँच केले आहे. परंतु याची किंमत पाहून तुम्ही चक्रवाल.(New Bike Launched)

याची एक्स-शोरूम किंमत आहे 36.07 लाख रुपये. या मॉडेलची खालची जागा V4 S ने व्यापलेली आहे ज्याची किंमत 28.40 लाख रुपये आहे.

कंपनीने नवीन मोटरसायकलची रचना रेसट्रॅकनुसार केली असून तिचा भार कमी करण्यासाठी बाइकमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

Advertisement

Ducati V4 SP ला लाइटवेट अलॉय व्हील आणि कार्बन फायबर बॉडीवर्क देण्यात आले आहे, ज्यामुळे बाईकचे वजन 1.4 किलोने कमी झाले आहे.

चमकदार काळ्या रंगात सादर केले

डुकाटीने ही बाईक जबरदस्त काळ्या रंगात सादर केली आहे आणि ती पाहताच तुम्ही बाईकचे फॅन व्हाल. येथे 1103 cc इंजिन आहे जे 13000 rpm वर 211 bhp पॉवर आणि 9500 rpm वर 124 Nm पीक टॉर्क बनवते. कंपनीने बाईकच्या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. नवीन बाईक सेमी-अॅक्टिव्ह ओहलिन्स सस्पेंशनसह येते, तर सर्वात चांगलेमनले जाणारे ब्रेम्बो ब्रेकिंग मिळेल.

Advertisement

किंमत 36 लाखांपेक्षा जास्त आहे

डुकाटी कार्बन फायबर क्लच कव्हर, लायसन्स प्लेट रिमूव्हल प्लग आणि मशीन्ड मिरर ब्लॉक-ऑफ प्लेट्स सारख्या ट्रॅक ऍक्सेसरीज देखील ऑफर करत आहे. बाईकमध्ये डुकाटी डेटा अॅनालायझर आणि GPS मॉड्यूल देखील आहे.

याशिवाय, नवीन Panigale V4 SP क्विकशिफ्टर, रायडिंग आणि पॉवर मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि लॉन्च कंट्रोल यासारखे अनेक फीचर्स देखील दिले गेले आहेत.

Advertisement

सदर बाईकची किंमत 36 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, या किंमतीवर तुम्ही नुकतीच लॉन्च केलेली मारुती सुझुकी सेलेरियो सारख्या 7 कार खरेदी करू शकता. या कार ची प्रारंभिक किंमत त 4.99 लाख रुपये आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker