निमगिरी येथे स्वयंचलित हवामान केंद्र सुरू

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- आदिवासी भागातील निमगिरी (ता. जुन्नर) येथे स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले. पृथ्वी मंत्रालय अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाच्या मार्फत या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पुणे येथील हवामान विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांचे हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

हे होते उपस्थित :- या वेळी हवामान विभागाचे कर्मचारी जे. डी. इंदुरीकर, संजय साबळे, प्रताप रसाळ, अविनाश कुंडले तसेच पंचायत समिती सदस्य काळूराम गागरे, सरपंच सुमन साबळे, युवक कार्यकर्ते जालिंदर साबळे, रामदास भांबुरे, डी. व्ही. केंद्रे, संतोष साबळे, ग्रामसेवक एस. के. दिघे व ग्रामस्थ उपस्थित होते.

साबळे बंधूंनी दिली विनामूल्य जागा :- भारतीय हवामानशास्र पुणे विभाग येथे कार्यरत असलेले निमगिरी गावचे सुपुत्र संजय सीताराम साबळे व विजय सीताराम साबळे या बंधूनी यासाठी आपली स्वतःची दोन गुंठे जागा उपकरण उभारणीसाठी विनामूल्य दिली.

Advertisement

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार :- या केंद्रामुळे सह्याद्रीच्या पर्वत रांगातील जवळपास सर्व गावांना तसेच स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे. मोबाईल अँपद्वारे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा ही देखील माहिती एका क्लीकद्वारे आयएमडीच्या एडबल्यूएसएआरजीच्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना मिळणार आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker