कुंद्रा यांची पूर्ण पोलखोल होण्याची शक्यता

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- पोलिसांच्या हाती लागलेल्या या सर्व्हरमधून कुंद्रा यांची पूर्ण पोलखोल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्याचे फोनही जप्त केले आहेत. तसेच हे फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राज कुंद्रा याची पोलखोल करण्यासाठी फोन आणि सर्व्हर या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचंही सांगितलं जात आहे.

सर्व्हर पोलिसांच्या हाती

पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट अपलोड करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. आयटी तज्ज्ञांच्या मदतीने पोलfस हे सर्व्हर खंगाळून काढून कुंद्रा यांच्या डर्टी पिक्चरचे काळेधंदे उघड करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Advertisement

व्हॉट्सअॅप चॅटींग

राज कुंद्राच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एच नावानं त्याने व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचा तो अॅडमिन होता. या ग्रुपमध्ये केवळ चारच लोक होते.

या ग्रुपमध्ये मॉडल्सचे पेमेंट आणि रेव्हेन्यूच्याबाबत चर्चा केली जात होती. आता आणखी नवी माहितीही पोलिसांच्या हाती आली आहे. यातील एक चॅट 10 नोव्हेंबर 2020मधील आहे. यात एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर करण्यात आलं आहे.

Advertisement

बोल्ड कंटेट हटवण्याच्या सूचना

पॉर्न कंटेट दाखवणाऱ्या सात ओटीटी प्लॅटफॉर्म्सला समन्स बजावल्याची ही बातमी आहे. कुंद्रा यांनी काही दिवसांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून बोल्ड कंटेट हटवण्याच्या सूचनाही सहकाऱ्यांना दिल्या. तसेच हॉटशॉट्सला पर्याय निर्माण करण्यासाठी काही तरी मार्ग काढला पाहिजे, असेही त्याने या चॅटमध्ये म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker