‘कोरेगाव भीमा हिंसाचार-एल्गार परिषदेचा संबंध नाही’

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :-  कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही, एल्गार परिषद कायदेशीर तरतुदींचे पालन करून घेतलेली परिषद होती, असा दावा आरोपी रोना विल्सन आणि अन्य एका आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका :- चार वर्षांपूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात एल्गार परिषद झाली होती आणि त्याच्या दुस-या दिवशी कोरेगाव भीमामध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. ज्या दिवशी परिषद झाली तेव्हा हिंसाचार झाला नाही, असे खंडपीठाला आज सांगण्यात आले.

या प्रकरणातील आरोपी विल्सन आणि सोमा सेन यांनी न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी वकील इंदिरा जयसिंग आणि वकील आनंद ग्रोव्हर यांच्यामार्फत याचिका केली आहे. याचिकांवर आज न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Advertisement

फडणवीस यांच्या वक्तव्याचा आधार :- कोरेगाव भीमा आणि परिषद यांच्यामध्ये कोणताही संबंध नाही. पुणे पोलिसांनी रितसर या कार्यक्रमाला परवानगी दिली होती; मात्र एनआयएने निवडक बाबीच घेतल्या आणि खटले दाखल केले आहेत, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला.

तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत दिलेल्या माहितीचा उल्लेख जयसिंग यांनी केला. यानुसार हिंसाचार घडविणारे लोक विशिष्ट समुदायाचे होते आणि स्मारकाला मानवंदना देण्यासाठी मनाई केल्यामुळे हिंसाचार झाला, असे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते, असा दावा जयसिंग यांनी केला.

एका गुन्हासाठी दोन एफआयआर कसे? :- हिंसाचार घडल्याबाबत कट्टरतावादी नेते मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात प्रथम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तेव्हा राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र केले होते.

Advertisement

या प्रतिज्ञापत्रात सरकारने नमूद केले होते की कोरेगाव भीमा हिंसाचारासाठी एकबोटे व अन्य काहीजण जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये. त्यानंतर आठ दिवसांनी दुसरा एफआयआर करण्यात आला. मग एका गुन्हासाठी दोन एफआयआर कसे, असा प्रश्न जयसिंग यांनी उपस्थित केला.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker