कोरेगाव भीमा दंगलीची आजपासून सुनावणी

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोरेगाव भीमामध्ये 2018 उसळलेल्या दंगलप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. दोन ते सहा ऑगस्ट या कालावधीत ही सुनावणी चालणार आहे. पुण्यात ऑनलाईन पद्धतीने ही सुनावणी होणार आहे. या वेळी कोरेगाव भीमा दंगलीतील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.

दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविणार :- आयोगातील दोन सदस्यांसमोर सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. कोलकाता उच्च न्यायालायचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव भीमा आयोग स्थापन करण्यात आला होता.

रेखाताई साहेबराव शिवले आणि प्रल्हाद ईश्वर गायकवाड या दोन साक्षीदारांचा जबाब आज नोंदवण्यात येईल. कोरोनामुळे आयोगाचं कामकाज बंद ठेवण्यात आले होते; मात्र आजपासून सुनावणीला सुरुवात होईल.

Advertisement

शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार :- कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. पवार यांनी अनेकदा माध्यमांसमोर कोरेगाव भीमा प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं.

तसेच अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी या माहितीचा तपासात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पवार यांनी सातत्याने कोरेगाव भीमा प्रकरणावर भूमिका घेत पुणे पोलिसांच्या तपासावर आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

तसेच याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवार यांनाही या प्रकरणात साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी होत होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील हीच मागणी केली होती.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker