Indians doing well in abroad : विदेशात भारतीयांचाच डंका ! कोल्हापूरच्या लीना नायर बनणार फ्रेंचमधील ‘ह्या’ दिग्गज कंपनीच्या सीईओ

MHLive24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीयांचे वर्चस्व वाढत आहे. भारतीय वंशाच्या आणि मुळच्या कोल्हापूर येथील असलेल्या लीना नायर यांची मंगळवारी लंडन येथील फ्रेंच लक्झरी समूह शनेलच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 52 वर्षीय लीना नायर या युनीलीव्हरमधील सर्वात कमी वयाच्या पहिला महिला मुख्य मानव संसाधन अधिकारी होत्या.(Indians doing well in abroad)

गोल्ड मेडलिस्ट लीना नायर: महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या लीना नायरने सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी जमशेदपूरच्या जेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट (एक्सएलआरआय) येथून एमबीए केले. लीना त्यांच्या बॅचची गोल्ड मेडलिस्ट विजेत्या होत्या.

प्रशिक्षणार्थी ते CHRO पर्यंतचा प्रवास: लीनाच्या प्रवासाची सुरुवात सर्वांना प्रेरणा देते. लीना यांनी 1992 मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2016 पर्यंत ती या कंपनीत CHRO पदावर पोहोचली.

Advertisement

त्याचबरोबर युनिलिव्हरचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मी युनिलिव्हरमध्ये काम केले याचा मला नेहमीच अभिमान वाटेल. मला इथे खूप प्रेम आणि आदर मिळाला.

2013 मध्ये लंडनला गेल्या

1969 मध्ये जन्मलेल्या लीना नायर 2013 मध्ये भारतातून लंडनला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना अँग्लो-डच कंपनीच्या लंडन मुख्यालयात नेतृत्व आणि संघटना विकासाच्या जागतिक उपाध्यक्ष बनवण्यात आले. 2016 मध्ये त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण सीएचआरओ बनल्या.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker