किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा !

MHLive24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कुटुंबावर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे आरोप केले असून या आरोपाचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

अल जेब्रिया कोर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

Advertisement

दरम्यान भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कटकारस्थान ताबडतोब थांबवावे असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker