Kia India  :  Kia India ने आज Kia Sonet X-Line भारतात 13.39 लाख (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च केली आहे. Sonet X लाइन दोन वेरिएंटमध्ये सादर केली गेली आहे.

ज्यामध्ये कॉस्मेटिक अपग्रेड्स दिसतात. Kia Sonet X-Line हे टॉप-स्पेक GTX+ वैरिएंटवर आधारित आहे. ज्यामुळे ते सब-फोर मीटर SUV सेगमेंटमध्ये मॅट फिनिश मिळवणारे पहिले मॉडेल आहे.

फीचर्स
Kia Sonet X-Line ला 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, टायगर नोज ग्रिल, फ्रंट आणि रीअर स्किड प्लेट्स, ORVM, रियर बम्पर, ग्लॉस ब्लॅक एलिमेंट्स मिळतात.

याशिवाय डार्क क्रोम फॉग लाइट गार्निश, डार्क हायपर मेटल अॅक्सेंट, सिल्व्हर ब्रेक कॅलिपर, शार्क-फिन अँटेनासाठी मॅट फिनिश यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

वेरिएंट आणि किंमत

Kia Sonnet X-Line ची किंमत Sonet X-Line 1.0 Turbo-Petrol DCT वेरिएंटची रु. 13.39 लाख आणि Sonet X-Line 1.5-लिटर डिझेल AT साठी रु. 13.99 लाख पासून सुरू होते.

किआ इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर म्युंग-सिक सोहन म्हणाले, “सॉनेट एक्स-लाइनसह, आम्ही आमचे डिझाइनिंग कौशल्य दाखवले आहे आणि एक स्टायलिश आणि वेगळी दिसणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली आहे.

कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये 32 टक्क्यांहून अधिक योगदानासह, सोनेटने या विभागात स्वतःला मजबूत केले आहे. आम्हाला खात्री आहे की Sonet X-Line या सणासुदीच्या हंगामात प्रीमियम आणि विशेष SUV उत्साही लोकांमध्ये छाप पाडेल.