Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :-बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलीस चौकशी बोलावणार आहेत. सोमवारी (26 ऑक्टोबर) रोजी कंगनाला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

तसेच कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान कंगना व महाराष्ट्र सरकार वाद काही दिवस चांगलाच रंगला होता. 17 ऑक्टोबरला कंगनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

या याचिकच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले. एफआयआरनुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आपल्या ट्वीटद्वारे जातीय सलोखा बिघडविण्याची आणि महाराष्ट्र सरकारच्या नावाची बदनामी करण्याचे काम केले आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology