Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :- सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. मध्यंतरी ती तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आली होती.

आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्याद्वारे तिने तिच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार असल्याची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. कंगनाचा भाऊ अक्षतचे लग्न होणार आहे. त्यासाठी बधाईचा कार्यक्रम झाल्याचे कंगनाने सांगितले.

अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या सोशल मीडियावर लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगना ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे.

ती साडी नेसली आहे आणि तिनं ज्वेलरी घातली आहे. कंगना म्हणाली की, बधाई ही हिमाचल प्रदेशमधील परंपरा आहे.

यामध्ये लग्नाचं सर्वात पहिलं निमंत्रण मामा-मामीला दिलं जातं. कंगनाच्या आईच्या माहेरी म्हणजे आजी-आजोबांकडे हा कार्यक्रम झाला.

अक्षतचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार आहे. बधाईचा कार्यक्रम झाल्यानंतर आता सर्वांना निमंत्रण दिलं जाणार आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology