जिओचा मोठा धमाका! ‘ह्या’ प्लॅनने रिचार्ज करा अन Jio फोन विनामूल्य मिळवा

MHLive24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रिलायन्स जिओकडे अनेक धमाकेदार प्लॅन आहेत. जिओच्या योजना इतक्या शानदार आहे की इतर टेलिकॉम वापरकर्त्यांनी त्यांचे सिम जिओत पोर्ट केले आहे. या प्लॅन मुळे जिओचे ग्राहकही सातत्याने वाढत आहेत. जिओ एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे, जिथे तुम्हाला जिओ फोन मोफत मिळू शकेल. जिओ फोनचा हा रिचार्ज प्लॅन त्या लोकांसाठी उत्तम सिद्ध होऊ शकतो ज्यांना पुन्हा पुन्हा रिचार्ज करणे अवघड वाटते. जियोफोनच्या या दोन 4G फीचर फोन प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया…

जिओफोन 1,499 रुपयांचा प्लॅन आणि त्याचे फायदे :- Jio ने लोकांना कमीत कमी किंमतीत उत्तम फीचरसाठी JioPhone प्लान सादर केला होता. या योजनेमध्ये, वापरकर्ते कमी खर्चात दीर्घ काळासाठी लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही 1499 रुपयांचा प्लान घेतला तर तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, 24 जीबी डेटा आणि जिओचे सर्व अॅप्स देखील मिळतील. या प्लॅनसह तुम्हाला Jio फोन मोफत मिळेल. या योजनेची वैधता 1 वर्ष आहे.

जिओफोन 1,999 रुपयांचा प्लॅन आणि त्याचे फायदे :- जर तुम्ही Jio चा 1999 रुपयांचा प्लान घेतला तर तुम्हाला मोफत Jio फोन मिळेल. यासह, अमर्यादित कॉलिंग आणि 48 जीबी डेटा दोन वर्षांसाठी उपलब्ध असेल. या योजनेची वैधता 2 वर्षे आहे. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत आहे.

Advertisement

JioPhone चे स्पेसिफिकेशन्स :- जिओ फोन हा एक फीचर फोन आहे. यात 2.4 इंच QVGA डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 1500mAH ची बॅटरी आहे, जी 9 तासांपर्यंत टॉक टाइम देते. फोनचे स्टोरेज वाढवण्यासाठी 128 जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये टॉर्च, मायक्रोफोन, स्पीकर्स आणि एफएम रेडिओ देण्यात आले आहेत. Jio 4G फीचर फोन हिंदी, इंग्रजीसह 18 भाषांना सपोर्ट करतो.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker