Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलेले जुबिलंट इंग्रेव्हिया तुमचे पैसे दुपटीहून अधिक वाढवू शकतात.

या वर्षी हा स्टॉक सुमारे 24 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे, परंतु आता बाजारातील तज्ञांच्या मते, तुमचे पैसे दुप्पट ते सुमारे 126 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

ज्युबिलंट इंग्रॅव्हिया ही विशेष रसायने, पोषण आणि आरोग्य उपाय आणि जीवन विज्ञान या क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. सध्या त्याचे शेअर्स BSE वर 446.15 च्या किमतीवर आहेत आणि मार्केट एक्सपर्ट्सनी यामध्ये गुंतवणुकीसाठी 1006 रुपये ची टार्गेट किंमत ठेवली आहे, म्हणजेच जर तुम्ही सध्याच्या किमतीनुसार गुंतवणूक केली तर तुमचे पैसे त्यात जवळपास दुप्पट होऊ शकतात.

मार्च 2022 तिमाहीच्या कंपनीच्या निकालांनुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीत 4.7 टक्के हिस्सा आहे.

बुल केसमध्ये तुम्हाला १५५% पर्यंत परतावा मिळू शकतो Jubilant Ingravia गुंतवणूक वाढवत आहे आणि विशेष रसायने आणि पोषण व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

यामुळे, त्याच्या महसुलात झपाट्याने वाढ अपेक्षित आहे आणि निव्वळ नफ्यात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 10 टक्के आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 11 टक्के वाढ अपेक्षित आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्म एडलवाईसने यामध्ये गुंतवणुकीसाठी 1006 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 126 टक्के जास्त आहे.

दुसरीकडे, आणखी एक ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटलने यामध्ये गुंतवणुकीसाठी 890 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा जवळपास 100 टक्के वर आहे.

याचा अर्थ यात तुमचे पैसे दुप्पट किंवा अधिक होण्याची शक्यता आहे. मोनार्क नेटवर्थ कॅपिटलने बुल केसमध्ये आपली लक्ष्य किंमत 1136 रुपये ठेवली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 155 टक्के अधिक आहे.

शेअर्स अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर 2021 रोजी जुबिलंट इंग्रॅव्हियाचे शेअर्स 877.95 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते.

यानंतर, रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोना महामारीमुळे त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला, ज्याचा परिणाम त्याच्या शेअर्सवर झाला.

या वर्षी 8 मार्च रोजी त्याचे शेअर्स 401.35 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरले होते, जे आता 446.15 रुपयांवर आहे. मोनार्क नेटवर्थ कॅपिटलच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या किमतीत त्यात गुंतवणूक केल्यास, केवळ एका वर्षात १२६ टक्के परतावा मिळू शकतो.