विदर्भातील भाजपच्या ‘या’ नेत्याविरोधात झारखंडमध्ये आमदार फोडाफोडीचा गुन्हा?

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :-  बिगर भाजपशासित राज्यांतील सरकारं उलथवून टाकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यानंतर राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंडसारखी राज्यं भाजपच्या निशाण्यावर आहेत.

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्यासाठी तेथील आमदारांना भाजपच्या बाजूला वळविलं जात आहे. त्यासाठी माजी मंत्री बावनकुळे झारखंडला गेले होते. आमदार खरेदीचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केला आहे.

कर्नाटक स्तातंतराचे मुंबई कनेक्शन :- कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यात भाजपचं मुंबई कनेक्शन पुढं आलं होतं. कर्नाटकमधील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांना मुंबईत आणण्यात आलं होतं. भाजपचे मेते त्यांचं संरक्षण करीत होते.

Advertisement

आता झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत असून भाजपच्या दोन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बावनकुळे यांचा त्यात हात आहे, असे मलिक यांनी सांगितले.

झारखंड पोलिसांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यात बावनकुळे यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव आहे. विशेष म्हणजे कर्नातकात पद सोडावं लागलेले मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावरही आमदार खरेदीचा आरोप असून त्यांची न्यायालयीन चाैकशी सुरू आहे.

आमदारांची फोडाफोडी :- महाराष्ट्रात पूरस्थिती असताना झारखंड सरकार पाडण्याचा केंद्र सरकार डाव आखत आहे. भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते. या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज यांची नावे आली आहेत, असं मलिक म्हणाले.

Advertisement

त्यांनी पळ काढला :- अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याच्या पोलिस चौकशीतून हा धक्कादायक गाैप्यस्फोट झाला. हा पत्रकार तीन आमदारांशी संपर्कात होता. या आमदारांशी डील करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्रीदेखील गेला असल्याचा आरोप त्यांनी केला.

21 जुलै रोजी भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहित कंबोज, अमित यादव, आशुतोष ठक्कर हे लोक पैसे घेऊन झारखंड येथे दाखल झाले; मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील दोन आमदारांचा सहभाग :- आमदार फोडाफोडीची चौकशी करण्यासाठी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून यापैकी एक पथक झारखंडमध्ये, तर दुसरे दिल्लीत आणि तिसरे पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे. महाराष्ट्रातील दोन आमदारांचादेखील त्यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे मलिक म्हणाले.

Advertisement

50 कोटी, मंत्रिपदाची ऑफर :- राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना भाजपचे लोक झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत. एका- एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात आले.

काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून 50 कोटी रुपये आणि मंत्रिपद देण्याची ऑफर होती. पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते; मात्र झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker