Alert : अलर्ट ! तुमच्याकडे असणारी 500 रुपयांची नोट खोटी आहे का? सरकारने दिली मोठी माहिती

MHLive24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- तुमच्याकडेही 500 रुपायांच्या नोटा असतील. हि बातमी त्यादृष्टीने महत्वाची आहे. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 500 रुपयांच्या नोटेशी संबंधित आहे.(Alert)

ज्यामध्ये तुमच्याकडेही ‘अशी’ 500 रुपयांची नोट असेल तर तुम्ही सावध राहा, असे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारच्या नोटाविषयी बोलले जात आहे ते जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय एक व्हिडिओ

Advertisement

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या दोन नोटांमधील फरक स्पष्ट करताना खरी आणि बनावटीची ओळख सांगितली जात आहे.

या व्हिडीओमध्ये खरी नोट दाखवून अनावश्यक तर्काच्या आधारे ते बनावट असल्याचे सांगितले जात आहे. वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची पीआयबीने वस्तुस्थिती तपासली असून त्याचे सत्य सांगितले आहे.

पीआयबीने वस्तुस्थिती तपासली

Advertisement

पीआयबीने या व्हिडिओबद्दल ट्विट केले आणि लिहिले की, ‘व्हिडिओमध्ये अशी चेतावणी दिली जात आहे की ₹ 500 ची अशी कोणतीही नोट घेऊ नये, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या छायाचित्राजवळ असेल.

परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. म्हणजेच पीआयबीच्या फॅक्ट चेकनुसार या व्हिडिओच्या फेक न्यूजला बळी पडू नका.

अशा प्रकारे करा फॅक्ट चेक

Advertisement

असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे फॅक्ट चेक  करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker