Share Market : शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार मालामाल ! 1 आठवड्यात कमवले 2.25 लाख कोटी रुपये

MHLive24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- मागील आठवडा शेअर बाजारासाठी सर्वोत्तम होता. केवळ या एका आठवड्यात गुंतवणूकदारांनी सुमारे 2.25 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2,28,367.09 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.(Share Market)

चला जाणून घेऊया कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक नफा कमावला आणि कोणत्या 3 कंपन्या आहेत ज्यामधील गुंतवणूकदार तोट्यात राहिले. देशातील टॉप 10 कंपन्यांच्या यादीतही बदल झाला आहे. या बातमीत हे देखील कळले आहे की आता मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील टॉप 10 कंपन्या कोणत्या आहेत.

मार्केट कॅप काय असते ?

Advertisement

स्टॉक मार्केट किंवा इतर कमोडिटीचे मार्केट कॅप काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे. शेअर बाजारात कंपनीचे जे काही शेअर्स असतील ते एकाच ठिकाणी लिहा. यानंतर, शेअर्सचे जे काही रेट असतील त्याने त्याचा गुणाकार करा. आता जो नंबर येईल त्याला त्या कंपनीचे मार्केट कॅप म्हटले जाईल.

या कंपन्यांनी पाडला पैशांचा पाऊस

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 1,35,204.46 कोटी रुपयांनी वाढून 16,62,776.63 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर HDFC बँकेचे मार्केट कॅप 5,125.39 कोटी रुपयांनी वाढून 8,43,528.19 कोटी रुपये झाले.

Advertisement

याशिवाय इन्फोसिसचे मार्केट कॅप 9,988.16 कोटी रुपयांनी वाढून 7,39,607.12 कोटी रुपये झाले आहे. ICICI बँकेचे मार्केट कॅप रु. 28,817.13 कोटींनी वाढून रु. 5,26,170.49 कोटी झाले. याशिवाय, HDFC चे मार्केट कॅप 7,050.11 कोटी रुपयांनी वाढून 5,08,612.95 कोटी रुपये झाले.

याच कालावधीत बजाज फायनान्सचे मार्केट कॅप 22,993.93 कोटी रुपयांनी वाढून 4,49,747.2 कोटी रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, SBI चे मार्केट कॅप 19,187.91 कोटी रुपयांनी वाढून 4,41,500.53 कोटी रुपये झाले.

या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे नुकसान केले

Advertisement

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 1,146.7 कोटी रुपयांनी घसरून 13,45,178.53 कोटी रुपयांवर आले. याशिवाय हिंदुस्थान युनिलिव्हरचे मार्केट कॅप 2,396 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,48,136.15 कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, भारती एअरटेलचे मार्केट कॅप 4,256.32 कोटी रुपयांनी घसरून 3,90,263.46 कोटी रुपयांवर आले.

आता या आहेत देशातील टॉप कंपन्या

रिलायन्सचे मार्केट कॅप 16,62,776.63 कोटी रुपये आहे
TCS चे मार्केट कॅप रु. 13,45,178.53 कोटी आहे
HDFC बँकेचे मार्केट कॅप रु 8,43,528.19 कोटी आहे
इन्फोसिसचे मार्केट कॅप रु 7,39,607.12 कोटी आहे
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मार्केट कॅप रु 5,48,136.15 कोटी आहे
ICICI बँकेचे मार्केट कॅप रु 5,26,170.49 कोटी आहे
HDFC चे मार्केट कॅप रु 5,08,612.95 कोटी आहे
बजाज फायनान्सचे मार्केट कॅप रु. 4,49,747.2 कोटी
SBI चे मार्केट कॅप 4,41,500.53 कोटी रुपये आहे
भारती एअरटेलचे मार्केट कॅप 3,90,263.46 कोटी रुपये आहे

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker