Best Investment Scheme : गुंतवणूक करण्याचा विचार करताय ? ही आहे बेस्ट स्कीम; काही वर्षात व्हाल करोडोंचे मालक

MHLive24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- आजकाल प्रत्येकालाच गुंतवणूक आणि बचतीचे महत्व समजले आहे. कोरोनाने माणसाला बचत करण्यास शिकवले. त्यामुळे आता अनेक लोक बचतीला महत्व देत आहेत.(Best Investment Scheme )

गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो. यामध्ये गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते.

बचत योजनेत अवघ्या 100 रुपयांत खाते उघडले जाऊ शकते, ज्यामध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही तुम्हाला पाहिजे तोपर्यंत गुंतवणूक करू शकता.

Advertisement

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा स्‍कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यात गुंतवणुकीमुळे तुम्‍ही करोडपती बनू शकता. आपण या ठिकाणी पोस्टाच्या 15 वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते अर्थात Public Provident Fund बद्दल बोलत आहोत.

दीर्घकालीन गुंतवणूक

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला या प्लॅनवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला जातो. पीपीएफमध्ये तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच 12,500 रुपये प्रति महिना गुंतवणूक करू शकता.

Advertisement

जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती काळासाठी हे चालवावे लागेल याबद्दल जाणून घ्या…

PPF वर 7.1% व्याज उपलब्ध आहे

सध्या, सरकार PPF खात्यावर 7.1% वार्षिक व्याज देते. यामध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. त्यानुसार, महिन्याला 12500 रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 15 वर्षांनी 40,68,209 रुपये होईल. यामध्ये एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये असून व्याज 18,18,209 रुपये आहे.

Advertisement

गुंतवणुकीनुसार मॅच्युरिटी दिली जाते

पीपीएफ योजनेत एका आर्थिक वर्षात 500 ते 1,50,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.हे पैसे एकरकमी किंवा मासिक देखील दिल जाऊ शकतात. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक पीपीएफ खाते उघडू शकतो. या योजनेत गुंतवणूक करताना, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूटही दिली जाते. या योजनेतील तुमच्या गुंतवणुकीनुसार मॅच्युरिटी दिली जाते.

या योजनेची वैशिष्ट्ये

Advertisement

यामध्ये तुम्ही पाच वर्षापासून ते 15 वर्षांपर्यंत तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.
पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून मॅच्युरिटी पेमेंट घेऊ शकता.
यामध्ये तुम्ही पाच वर्षांची गुंतवणूक मर्यादा आणखी वाढवू शकता.

करोडपती कसे व्हाल ?

1. समजा तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
2. PPF मध्ये 15 वर्षे दरमहा 12500 रुपये जमा केल्यानंतर, तुमच्याकडे 40,68,209 रुपये असतील.
3. आता हे पैसे काढावे लागणार नाहीत, तुम्ही 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी PPF वाढवत राहा.
4. म्हणजेच, 15 वर्षानंतर, आणखी 5 वर्षे गुंतवणूक करत रहा, म्हणजेच 20 वर्षानंतर ही रक्कम असेल – 66,58,288 रुपये.
5. जेव्हा ते 20 वर्षाचे होईल , तेव्हा पुढील 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढवा, म्हणजेच 25 वर्षांनी रक्कम असेल – रु 1,03,08,015.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker