भाजपच्या कारभाराचा पोलखोल कराः राज ठाकरे यांचे आदेश

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याची चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांच्या दोन विधानांनी युती होण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यतचा आहे. त्यातील एक विधान भाजपच्या पुणे महापालिकेतील कारभारासंबंधीचे आणि दुसरे परप्रांतीयांसंबंधीचे आहे.

एवढा पैसा गेला कुठे?

महापालिकेचे अंदाजपत्रक आठ हजार कोटीच्या पुढे गेले आहे; पण त्यातून नागरिकांना काय सुविधा मिळाल्या? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठे गेला, याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपनेकाय केले याची पोलखोल करा. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपापल्या वॉर्डाचे संघटन मजबूत करा, असे आदेश त्यांनी दिले.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राज यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक मतदारसंघाची किमान दीड ते दोन तास बैठक घेऊन चर्चा केली, पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे हेदेखील ऐकून घेतले. दरम्यान, राज यांच्याशी थेट संवाद साधता आल्याने कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह निर्माण झाला होता.

Advertisement

स्टिंग ऑपरेशन करा

आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना होईल, की वॉर्ड रचना याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मनसेने वॉर्ड रचनेला महत्त्व देऊन त्याच पद्धतीने संघटनेचे सर्व पदे भरावीत.

गेल्या पाच वर्षांत प्रत्येक प्रभागात कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटीच्या पुढे गेले आहे; पण त्या प्रमाणात काम झालेले दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक भागाची माहिती काढून स्टिंग आॅपरेशन करा असे आदेशही बैठकीत दिले आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker