लाखभर रुपये गुंतवून करा ‘याची’ लागवड, दरमहा होईल 8 लाखांची कमाई, सरकारही करेल मदत

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :-  जर आपल्याला नोकरी करण्याचा कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पैसे कमावण्यासाठी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला एक उत्तम व्यवसायाची कल्पना सांगत आहोत. जिथे आपण कमी पैसे खर्च करून जास्त पैसा कमावू शकता ( यासाठी उत्तम कल्पना म्हणजे काकडी फार्मिंग आहे.

काकडीची लागवड सुरू करून लाखो कमवा :- या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसांत पूर्ण होतो. तसे उन्हाळ्याच्या काळात काकडीची लागवड होते. परंतु पावसाळ्यात काकडीचे पीक जास्त घेतले जाते. काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते. काकडी लागवडीसाठी जमीन पीएच. 5.5 ते 6.8 चांगली मानली जाते. काकडीची लागवड नद्या आणि तलावाच्या काठावरही करता येते.

सरकारकडून अनुदान घेऊन व्यवसाय सुरू करा :- काकडीची लागवड करून लाखोंची कमाई करणारा यूपी येथील शेतकरी दुर्गाप्रसाद आहे. ते म्हणतात की, शेतीत नफा मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात काकडीच्या बिया पेरल्या आणि अवघ्या 4 महिन्यांत 8 लाख रुपये मिळवले.

Advertisement

त्याने आपल्या शेतात नेदरलँडच्या काकडीच्या बिया पेरल्या. दुर्गाप्रसादच्या मते, नेदरलँड्समधून काकडीची बियाणी पेरणारा मी पहिली शेतकरी आहे. यामधील विशेष गोष्ट म्हणजे या प्रजातीच्या काकड्यांमध्ये जास्त बिया नसतात. ज्यामुळे मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये काकडीची मागणी जास्त आहे.

दुर्गाप्रसाद सांगतात की, त्यांनी बागायती विभागाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेऊन शेतीतच सेडनेट घर बांधले होते. सबसिडी घेतल्यानंतरही मला स्वतःहून 6 लाख रुपये खर्च करावे लागले. याशिवाय नेदरलँड्सकडून त्याला 72 हजार रुपयांचे बियाणे मिळाले. बियाणे पेरल्यानंतर 4 महिन्यांनंतर त्याने आठ लाख रुपयांच्या काकडी विकल्या.

पिकासंदर्भात :- काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते.

Advertisement

हवामान व जमीन :- काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी मध्‍यम ते भारी जमीन या पिकास योग्‍य असते.

लागवडीचा हंगाम :- काकडीची लागवड खरीप आणि उन्‍हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठीकाकडीची लागवड जून जूलै महिन्‍यात व उन्‍हाळी हंगामामध्‍ये जानेवारी महिन्‍यात करतात.

वाण :- शीतल वाण – ही जात डोंगर उताराच्‍या हलक्‍या आणि जास्‍त पावसाच्‍या प्रदेशात चांगली वाढते. बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात. फळे रंगांनी हिरवी व मध्‍यम रंगाची असतात कोवळया फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.

Advertisement

पुना खिरा – या जातीमध्‍ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाणे बाजारात मिळते. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्‍हाळी हंगामात चांगली असून हेक्‍टरी उत्‍पादन 13 ते 15 टन मिळते.

प्रिया – ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.

पुसा संयोग – लवकर येणारी जात असून फळे हिरव्‍या रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 25 ते 30 टन मिळते. या शिवाय पॉंइंट सेट, हिमांगी, फुले शुभांगी यासारख्‍या जाती लागवडीस योग्‍य आहेत.

Advertisement

प्रेरणादायी कथा – ऋषी टेंभरे या तरुण अॅटोमोबाईल अभियंत्याने ठिबक सिंचनाच्या सहायाने दोन महिन्यांत ८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले. ऋषी टेंभरेने चंद्रपुरातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर पुणे,मुंबई,चेन्नई च्या कंपनीतील कंपन्याच्या ऑफर आल्या परंतु, घरच्या पारंपरिक शेतीत त्याचे मन रमायचे.

त्याने आधुनिक तंत्रज्ञानावर शेती करण्याचा निर्धार केला. चार एकर शेतीत काकडीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. सुरूवातीला चांगली नांगरणी केली. सेंद्रिय खताचा छिडकाव केला. त्यावर निज्जा कंपनीची काकडीचे बियाणे डिसेंबर महिन्यात लावले.

पाण्याचा योग्य वापर करावा म्हणून ठिबक सिंचनाचा उपयोग केला. नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात चार एकरातील काकडीची शेती फुलली. त्याला यामधून ३० टन काकडीचे उत्पादन निघाले. दोन महिन्यातच त्याला आठ लाखांच्या काकडीचे उत्पादन झाले.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker