Investment in RBI’s scheme : रिझर्व्ह बँकेच्या ‘ह्या’ शानदार योजनेत थेट करा गुंतवणूक; पण कशी ? वाचा…

MHLive24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच रिटेल डायरेक्ट स्कीमची सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.(Investment in RBI’s scheme)

रिटेल डायरेक्ट स्कीमला १२ नोव्हेंबर रोजी लॉन्च झाल्यापासून १२,००० हून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली.

या योजनेचा उद्देश केंद्र सरकारी रोख्यांमध्ये मध्ये गुंतवणूक सुलभ करणे हा आहे. या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो.

Advertisement

तुम्ही गुंतवणूक कशी कराल?

सर्व प्रथम तुम्हाला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अकाउंट (गिल्ट खाते) उघडावे लागेल. ज्याप्रमाणे तुम्हाला शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी डिमॅट खाते उघडावे लागते, त्याचप्रमाणे तुम्हाला व्यवहार करण्यासाठी गिल्ट खाते उघडावे लागेल.

आरबीआयद्वारे हे खाते व्यवस्थापित केले जाईल आणि तुम्ही ते फक्त ऑनलाइन ऑपरेट करू शकाल. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तर हे आपल्या बँक खात्यासारखे असेल. गिल्ट खाते तुम्ही स्वतः किंवा संयुक्तपणे उघडू शकता.

Advertisement

फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट एक्ट (FEMA) 1999 अंतर्गत देखील आपण गुंतवणूक करू शकतो. या योजनेत किमान १ वर्षापासून ते ३० वर्षांपर्यतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येणार आहे.

कसा करायचा अर्ज

आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल तो तिथे भरायचा आहे. नोंदणी झाल्यानंतर तुम्ही सरकारी कर्जरोखे किंवा बॉंड विकत घेऊ शकता.

Advertisement

सरकारकडून दर शुक्रवारी यासाठी बोली लागते. याची विक्री सरकारी डेट मॅनेजरकडून केली जाते. बॉंडची खरेदी करण्यासाठीची रक्कम तुम्ही युपीआय, नेट बॅंकिंगद्वारे देऊ शकता. तुमची बॉंड खरेदी होताच तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. तुम्हाला एका बॉंडसाठी एकच बोली लावता येणार आहे.

खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कोणत्याही बँकेत बचत खाते
पॅन क्रमांक

Advertisement

KYC साठी अधिकृतपणे वैध असलेले कागदपत्रे. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, नरेगा जॉब कार्ड आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरने जारी केलेले पत्र यांचा समावेश आहे.
ई- मेल आयडी.
मोबाईल नंबर.

किती रक्कम जमा करावी लागेल

सध्या सरकारने एकूण ९७ बॉंड बाजारात आणले आहेत. याचा कालावधी ३ महिन्यांपासून ते ४० वर्षांपर्यतचा आहे. यामधील एकूण भांडवल ७८.५ लाख कोटी रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी संस्थात्मक गुंतवणुकदारांना किमान ५ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल तर किरकोळ गुंतवणुकदाराला १०,००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे.

Advertisement

कोरोना काळात सरकारी बॉंडवर मिळणारा परतावा आधीच्या तुलनेत कमी झाला आहे. सध्या हा ६ टक्क्यांच्या आसपास आहे. परंतु बॅंकेत एफडी करून मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा हा व्याजदर चांगला आहे. शिवाय हे बॉंड आणि गुंतवणूक सरकार आणि आरबीआयकडे केली जाते आहे. त्यामुळे ती सुरक्षित आहे आणि त्यात प्राप्तिकरदेखील द्यावा लागणार नाही.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker