Without internet you can make UPI payments : भारी जुगाड ! इंटरनेट नसतानाही करू शकता UPI पेमेंट

MHLive24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- मागील काही काळात युपीआयवरुन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा इंटरनेटचा स्पीड कमी किंवा नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने UPI वरुन पेमेंट होत नाही. परंतु एक पद्धत अशीही आहे ज्याचा वापर करुन तुम्ही इंटरनेटशिवाय UPI वरुन पेमेंट करु शकता.(Without internet you can make UPI payments )

ऑफलाईन पेमेंट करण्यासाठी एक USSD कोड असतो. तो तुम्ही फोनच्या डायलवरुन अ‍ॅक्सेस करु शकता. ही सेवा सर्व मोबाईल युझर्ससाठी उपलब्ध आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेटचे कनेक्टिव्हिटीची गरज नाही.

तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या डायलरवर *99# USSD कोड वापरावा लागेल. ही *99# सेवा भारतात नॉन-स्मार्टफोन वापरकर्त्यांसह सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली.

Advertisement

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी, हे *99# एक आपात्कालीन सुविधा आहे. जे त्यांच्याकडे इंटरनेट नसल्यास ते वापरू शकतात, फीचर फोन वापरकर्त्यांसाठी, हा एकमेव मार्ग आहे की ते कोणत्याही UPI सुविधेमध्ये प्रवेश करू शकतात.

99# वापरून पैसे कसे पाठवायचे?

टप्पा 1- सर्वप्रथम फोनचा डायल पॅड उघडा आणि *99# टाईप केल्यानंतर कॉल बटणावर टॅप करा. हे आपल्याला 7 पर्यायांसह नवीन मेनूवर घेऊन जाईल.

Advertisement

मेनूमध्ये पैसे पाठवा, पैसे मिळवा, शिल्लक तपासा, माझे प्रोफाईल, प्रलंबित विनंत्या, व्यवहार आणि यूपीआय पिन यांसारख्या पर्यायांची सूची असेल.

टप्पा 2- जर तुम्हाला फक्त पैसे पाठवायचे असतील तर डायल पॅडवर क्रमांक 1 दाबून पैसे पाठवा पर्याय निवडा. यानंतर तुम्ही फोन नंबर, यूपीआय आयडी किंवा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड वापरून पैसे पाठवू शकाल.

टप्पा 3- नंतर रक्कम प्रविष्ट करा आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI पिन टाका. मग तुम्हाला फक्त ‘Send’ टॅप करायचे आहे.

Advertisement

UPI म्हणजे काय?

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस / यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे त्वरित बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. UPI द्वारे तुम्ही एका बँक खात्याला अनेक UPI अॅप्ससह लिंक करू शकता. त्याच वेळी एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती चालवली जाऊ शकतात.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker