Interest free loan : शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी : आता 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज ! वाचा या बँकेची…

MHLive24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- देशात पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देणारी लातूर जिल्हा बँक पहिली ठरली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आँनलाईनद्वारे मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे.(Interest free loan )

आता पर्यंत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत पीक कर्ज हे दिले जात होते पण आता यापुढे 5 लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देणार असल्याची घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली आहे.

आता पर्यंत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज हे दिले जात होते. मात्र, यामधून योग्य तो फायदे शेतकऱ्यांना घेता येत नाही.

Advertisement

अधिकची रक्कम अदा केल्याने शेतकऱ्यालाही उलाढाल करण्यास सोईस्कर होणार असल्याने हे निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव पीक कर्जाबरोबरच जिल्ह्याभरात असलेल्या शाखांच्या ठिकाणी वेगवेगळ्या सोई-सुविधा देण्याची निर्धार या सर्वसाधारण सभेत संचालकांनी व्यक्त केला आहे.

गेल्या 30 वर्षामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातही उभारण्यात आलेल्या सहकारी सोसायटी कोटी रुपयांच्या झाल्या आहेत.

सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचे काम या जिल्हा बॅंकेने केले आहे. कोविड काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपये मदत केली.

Advertisement

बँकेच्या कर्मचारी अधिकारी यांना दिवाळी बोनस म्हणून 22 टक्के व कोविड काळात अधिक काम केल्याने कर्मचाऱ्यांना बोनस व्यतिरिक्त एक महिन्याचा जादा पगार देण्याची घोषणा केली आहे.

कोविड आपत्कालीन काळात देखील 100 टक्के वसुली करून एन.पी. ए सुद्धा निरंक ठेवण्यात बँकेचे अधिकारी कर्मचारी, गटसचिव यांचा मोठा सहभाग असल्याचे यावेळी दिलीप देशमुख यांनी सांगितले.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker