Strange Insurance Policies : छातीच्या केसांपासून बायकोच्या ‘फीलिंग्स’ पर्यंत विमा! डोके हलवून सोडतील ‘ह्या’ पॉलिसी

MHLive24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- तुम्हा सर्वाना विमा पॉलिसींबद्दल माहिती असणारच यात शंका नाही. पण तुमची माहिती फक्त आयुर्विमा, अपघाती, आरोग्य किंवा मालमत्ता विमा पुरती मर्यादित असेल. परंतु हि माहिती अपुरी आहे. कारण जगात अशा विमा पॉलिसी आहेत, जे पाहून तुम्ही चकित होऊन जाल. जगात फीलिंग्स पासून तर अगदी केसांपर्यंत विमा पॉलिसी आहे.(Strange Insurance Policies)

व्हँपायर, झोम्बी अटैक पॉलिसी

लंडनस्थित विमा कंपनीने लोकांसाठी एक विचित्र पॉलिसी कस्टमाईज केली आहे. ही कंपनी भूतांमुळे होणारे नुकसान किंवा मृत्यू यावर कव्हरेज देण्याचा दावा करते. कंपनी झोम्बी अटॅक किंवा व्हॅम्पायर अटॅक विमा पॉलिसी देखील देते.

Advertisement

एलियन किडनॅप विमा

2019 च्या अहवालानुसार, लंडन-आधारित विमा कंपनीने एलियनद्वारे अपहरण झाल्यास त्याची देखील भरपाई करण्यासाठी विमा दिला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण युरोपातील 30,000 पेक्षा जास्त लोकांनी विमा कंपनीवर विश्वास ठेवला आणि विमा पॉलिसी विकत घेतल्या.

नारळ अपघात विमा

Advertisement

2002 मध्ये, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये नारळामुळे जखमी झालेल्या लोकांनी नुकसानीचा दावा दाखल केला तेव्हा त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. एका विमा कंपनीने लोकांच्या डोक्यावर नारळ पडण्याच्या अपघाताच्या बदल्यात विमा क्लेम करून विकले होते.

अंग आणि केसांचा विमा

शरीराच्या अवयवांसाठीही विमा पॉलिसी अस्तित्वात आहे. उदाहरणार्थ, बेन टर्पिन, मूक चित्रपटांचे अभिनेता आणि कॉमेडियन यांनी डोळ्यांचा विमा उतरवलेला होता, सुपर मॉडेल हेडी क्लम्सने पायांचा विमा उतरवला होता. गायिका डॉली पार्टनचा स्तनाचा विमा होता. गायक टॉम जोन्सने एकदा त्याच्या छातीच्या केसांचा विमा काढला होता.

Advertisement

वधूच्या ‘फीलिंग्स’चा विमा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्न ठरल्यानंतर वधू किंवा वराच्या भावना बदलल्या आणि त्यांनी लग्नाला नकार दिला, तर जगात यासाठी देखील विमा संरक्षण आहे. या कवर ला ‘चेंज ऑफ हार्ट’ किंवा ‘कोल्ड फीट’ असे म्हणतात.

म्हणजेच, लग्नाआधी वधू किंवा वराने त्यांचे मत बदलल्यास आणि विवाह रद्द झाल्यास ते विमा संरक्षण प्रदान करते. चेंज ऑफ हार्ट कवरेजसाठी अट अशी आहे की वधू किंवा वरचे मन बदलल्यास, विवाह किमान एक वर्ष अगोदर रद्द करावा लागेल आणि कव्हरेजमध्ये लग्नाचा खर्च समाविष्ट नसेल.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker