प्रेरणादायी! नोकरी सोडली अन केली ‘ही’ शेती; आता वर्षाला करतोय करोडोंची उलढाल

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  निसर्गाची वारंवार शेतकऱ्यांना हुलकावणी, शेतमालाला मिळणारा अल्पभाव यामूळे शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. सध्या कोरफडीची मागणी वाढत चालल्याने भारतात मोठ्याप्रमाणात एलोवेराची शेती केली जात आहे.

औषधी गुणधर्म असलेल्या एलोवेरापासून अनेक ब्यूटी प्रॉडक्ट आणि इतर महत्वाचे प्रॉडक्ट बनवले जातात. देशातील लघु उद्योगांपासून मल्टिनॅशनल कंपन्या एलोवेरा प्रॉडक्ट विकून कोट्यवधी रूपये कमावत आहेत. अशावेळी तुम्ही एलोवेराची शेती करून लाखो रुपये कमावू शकता. अशीच किमया एका शेतकऱ्याने करून दाखवली आहे.

जैसलमेरमधील नगरपालिकेत धनदेवला हा शेतकरी अभियंता पदावर होता. पण या नोकरीत त्याचं मन कधीच रमलं नाही. काहीतरी वेगळं करण्याची त्याची इच्छा होती. यामुळे त्याने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्याच्याकडे जमीन होती, पाणीही होतं पण नेमकं काय करायचं याची कल्पना नव्हती. नवीन काहीतरी पीक घेण्याचा त्याचा विचार होता. त्याने दिल्लीत कृषी प्रदर्शनाला भेट दिली. मग त्याने कोरफड, आवळा आणि गुंदाची झाडं लावली.

Advertisement

अमेरिका, हाँगकाँग आणि ब्राझीलमध्ये कोरफडीला प्रचंड मागणी आहे. यामुळे धनदेव याने सुरुवातीला शेतात कोरफडीची ८० हजार रोपं लावली होती. आता त्यात वाढ होऊन ७ लाख रोपं झाली आहे.

गेल्या चार महिन्यांत साधारण १२५ ते १५० टन प्रक्रिया केलेला कोरफडीचा रस हरिद्वारमधील पतंजलीच्या कारखान्याला पुरवल्याचं धनदेव यानं सांगितलं. आता त्याच्या शेतीची एकूण वार्षिक उलाढाल दीड ते दोन कोटी इतकी आहे. याशिवाय त्याने आपली स्वतःचीच ‘नॅचरेलो अॅग्रो’ नावाची एक कंपनी सुरू केली आहे.

यासाठी करावा लागेल खर्च

Advertisement
  • एलोवेराच्या शेतीमध्ये मटेरियल, प्लँट, खत, लेबर, हार्वेस्टिंग, पॅकेजिंग इत्यादीसाठी खर्च येतो.
  • देशाच्या अनेक भागत एकवेळा एलोवेरा लावून 3 वर्षापर्यंत उत्पादन घेता येते.
  • तर काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत पिक होते.
  • यामध्ये 50 ते 60 हजार रूपये लावून 5 ते 6 लाख रूपये नफा कमावू शकता.
  • कमी खर्चात हॅन्ड वॉश सोपचा बिजनेस करू शकता.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker