प्रेरणादायी ! केली ‘ह्याची’ लागवड; सव्वा एकरात ९ लाखांचे उत्पन्न

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :-  आजचा तरुण शेतकरी नाविन्नपूर्ण आणि भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीक पद्धतीकडे वळलेला आहे. पारंपारिक पीक पद्धतीमध्ये तीच-तीच पिके घेऊन उत्पन्नामध्ये म्हणावा तसा उतारा आणि पैसा मिळत नाही. त्यात रोजचा वाढणारा उत्पन्न खर्च आणि बाजारातून येणारा परतावा कमी असतो. त्यामुळे शेतकरी चोखंदळपणे नवीन पिकांची निवड करताना दिसत आहे.

अशाच पद्धतीने रानमसले येथील अवघ्या २२ वर्षांच्या युवा शेतकऱ्याने वाखाणण्याजोगे धाडसी निर्णय घेतला. आपल्या शेतातील परंपरागत पिकांऐवजी शतावरी या औषधी वनस्पतीचे उत्पादन घेतले. केवळ सव्वा एकरात ९ लाखांचे उत्पन्न कमावून या युवकाने आपल्या शेतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सुदर्शन उर्फ नानासाहेब अनंत पाटील या युवा शेतकऱ्याने शतावरी या औषधी वनस्पतीची एका कंपनीच्या साथीने हमीभावाच्या करारावर लागवड केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये संबंधित कंपनीसोबत करार करून त्याने सव्वा एकरात १ हजार १३३ रोपांची ८ बाय ६ अंतरावर ठिबक सिंचन करून लागवड केली.

Advertisement

महिन्यानंतर प्रति रोपास १०० ग्रॅम लिंबोळी पेंड, मासळी खत, सहा टन गांडुळ खत दिले. आठवड्यातून एकदा ठिबकद्वारे जीवामृत सोडले. विशेष म्हणजे हे पीक कमी पाण्यावर येते. यामुळे पहिले सहा महिने आठवड्यातून फक्त एक तास ठिबक पाणी व सहा महिन्यांनंतर एक दिवसाआड एक तास ठिबकने पाणी दिले.

१ हजार १३३ रोपांपासून सरासरी २० टन मुळ्यांचे उत्पादन त्यांना अपेक्षित असते . या शतावरीच्या मुळ्या करारानुसार ५० रुपये किलो दराने विकल्या. सव्वा एकरात दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असून, खर्च वजा जाता ९ लाखांचे उत्पादन त्यांना मिळाले .

जमीन आणि हवामान :- या पिकाच्या लागवडीसाठी सर्व प्रकारची माती चालते. पण वाळूमिश्रीत पोयट्याची, लाल किंवा काळी जमीन अधिक चांगली असते. मातीत पाण्याचा निचरा होत असेल, सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले व २०-३० सेंमी भुसभुशीत अशी जमीन असावी. या पिकासाठी उष्ण किंवा समशीतोष्ण वातावरण चांगले मानवते. दुष्काळी भागात त्याचबरोबर थंड वातावरणात पण पीक येऊ शकते.

Advertisement

पूर्वमशागत :- लागवडीचे क्षेत्र निवडताना शक्यतो जमीन भुसभुशीत असावी. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करून २०-२५ टन चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे. रोटावेटरने किंवा डिस्क हॅरोने ढेकळ फोडून घ्यावीत. पाऊस पडल्यानंतर कुळवणी करून ६० सेंमी अंतराच्या सऱ्या काढून घ्याव्यात.

लागवड :- मान्सून हंगामात (जून-ऑगस्ट) तयार केलेल्या सरी-वरंबा पद्धतीचा लागवडीसाठी वापर करावा. शतावरीची वंशवृध्दीसाठी १ किलो बियाणे प्रती हेक्टर, गड्यांच्या फुटव्यापासून किंवा ओल्या मुळ्यापासून पण रोपे तयार केली जातात.

दोन सऱ्यांमधील अंतर ६० सेंमी ठेवावे. त्याचबरोबर सरी वरंब्याची उंची ज्यास्त चढवून घ्यावी कारण याची मुळ्या १-१.५ फुटापर्यंत खोल जातात, त्या हिशोबाने ६० सेंमीपर्यंत वरंब्याची उंची करून घ्यावी कारण काढणीला त्रास होत नाही. दोन रोपांमधील अंतर ६० ते ७५ सेंमी ठेवावे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker