प्रेरणादायी! कोरोनाच्या काळात घराबाहेर पडत येईना; ‘ह्या’ युवा शेतकऱ्याने बनविली ‘स्मार्ट’ सफरचंद बाग, मोबाइलवरूनच ऑपरेट करतोय सर्व काही…

MHLive24 टीम, 11 जुलै 2021 :-  जर तुम्ही योग्य दिशेने कठोर परिश्रम केले तर एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यशाचा हा मूलभूत मंत्र आहे. सर्वांना ठाऊक आहे की आपण कृषी प्रधान देशाचे रहिवासी आहोत. इथली खूप मोठी लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते, पण आजचे तरुण शेती सोडून नोकर्‍यासाठी शहरांकडे धावत आहेत.

जर तरुणांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली तर भरपूर पैसे मिळू शकतात. हिमाचल मधील तेजस्वी डोग्रा यांनी याचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. कोरोना काळात घराबाहेर पडता येत नसल्याचा उपयोग करत त्यांनी सफरचंदाची स्मार्ट बाग बनविण्याचे काम केले.

देशातील ही पहिलीच स्मार्ट बाग असल्याचे म्हटले जात आहे. सिमल्यापासून ८८ किमीवर असलेल्या चौपाळ येथील ही बाग तेजस्वी डोग्रा हा तरुण घरबसल्या मोबाईलवरून नियंत्रित करत आहेत. डोग्रा यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथे झाले असून त्याने पदवी पंजाब विद्यापीठातून घेतली आहे.

Advertisement

लहानपणापासून त्यांना इलेक्ट्रॉनिक्सची आवड आहे. कोरोना मुळे लॉकडाऊन सुरु झाल्यावर तेजस्वीने आपली बाग स्मार्ट बनवावी यासाठी प्रयत्न केले आणि कोडिंग प्रोग्रामिंग करून स्मार्ट बाग तयार केली. त्यांनी इटली मधून सफरचंदाची सुमारे २५० रोपे आणली. त्याची लागवड केली.

तेथे ठिबक सिंचन, कीटक नाशक फवारणी, तापमान नियंत्रण या सर्व सुविधा मोबाईल वरून नियंत्रित करता येतात. फवारणी आणि तापमान नियंत्रणासाठी स्मार्ट ओव्हरहेड शॉवर लावले आहेत. बागेची पाहणी करण्यासाठी ३६० अंशात फिरणारे कॅमेरे असून तेही मोबाईलशी जोडले गेले आहेत.

बागेचे मुख्य दार उघडणे, बंद करणे ही सुविधा सुद्धा मोबाईल वरून कंट्रोल करता येते. सेन्सर आणि मायक्रोचीपच्या सहाय्याने मोबाईल वरून ही सर्व कामे तेजस्वी घरबसल्या करू शकतात.

Advertisement

दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मुखई येथील अभिजित धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंद लागवडीचा प्रयोग केला, त्यामध्ये त्यांना यश आले आहे. धुमाळ यांनी दोन वर्षांपूर्वी हर्मन-९९ या जातीच्या सफरचंदाची लागवड केलेल्या सफरचंदाला सध्या तिसऱ्या वर्षी फळे लागली आहेत.

कमी श्रमात, कमी पाण्यात, शिरुर तालुक्यातील वातावरणात चांगले पीक म्हणून सफरचंद चांगला पर्याय असून शेतकऱ्यांनी आवर्जून लागवड करावी, असे आवाहन अभिजित धुमाळ यांनी केले आहे.

शिरुरच्या मखई गावात सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोगशिक्रापूर जवळील मुखई गावचे अभिजित प्रल्हाद धुमाळ व अतुल प्रल्हाद धुमाळ या दोन बंधूंची प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख आहे. अभिजित शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात.

Advertisement

ऊसाच्या सर्व वाणांची बियाणे बनवण्यासाठी त्यांची सर्व राज्यात ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सफरचंद लागवडीचा विचार केला आणि कामही सुरू केले. हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी भागातील शेतक-यांचे फोन नंबर मिळवून त्यांनी संपर्क सुरू केला व इंटरनेटवरुनही अनेक माहिती संकलित केली. तब्बल सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर त्यांनी हर्मन-९९ हा सफरचंदाचा वाण निवडला.

सिताफळासारख्याच पध्दतीने सफरचंदाची लागवड १२ फूट लांब व १२ फूट रूंद या अंतराने पाऊण एकरात साधारण २०० झाडांची लागवड केली. यासाठी त्यांनी कुठलेच वेगळे खत वापरले नाही. वेगळी मशागत करावी लागली नाही, असा अनुभव आल्याचे अभिजित धुमाळ यांनी सांगितले आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker