Inspirational Story : प्रेरणादायी ! ‘ह्या’ व्यवसायातून 22 वर्षांची तरुणी कमावतेय 70 हजार रुपये

MHLive24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- आजकाल महिला देखील आर्थिक स्वायत्त बनत आहेत. ते कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. याचेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे काश्मीरमधील पुलवामा येथील निलोफर जान.(Inspirational Story)

एक काळ असा होता की निलोफरला तिची सेमिस्टरची 16,000 रुपये फीही भरता येत नव्हती. पण आज ती महिन्याला सुमारे 70,000 रुपये कमावते आहे.

पण ती आज स्वतःची फी भरण्यास सक्षम आहे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या गरजा देखील पूर्ण करते. तिला अर्थी स्वायत्त करण्यात महत्वपूर्ण वाटा आहे मशरूमचा. मशरूमच्या लागवडीमुळे निलोफरला चांगले आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवन जगता आले आहे.

Advertisement

22 वर्षीय निलोफरने एका स्थानिक कृषी केंद्राद्वारे आयोजित बटन मशरूम लागवडीचा आठवडाभराचा कोर्स केला अन त्यानंतर तीने हे सर्व सुरु केले.

घरातच सुरू केली मशरूमची लागवड

एका आठवड्याच्या कोर्सनंतर, तिने लवकरच घरी मशरूम वाढवण्यास सुरुवात केली आणि दरमहा हजारो रुपये कमावले. त्यांची सुरुवातीची गुंतवणूक 15,000 रुपये प्रति महिना होती. निलोफर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. आज त्यांना एवढा नफा मिळतो जो त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे.

Advertisement

तीन महिन्यांचा कालावधी

निलोफरला मशरूमचे एक युनिट वाढण्यास तीन महिने लागतात, त्यातून तिला सुमारे 500 किलो मशरूम मिळते. द बेटर इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, निलोफर म्हणते की तिचे कुटुंब गंभीर आर्थिक संकटातून जात होते, आणि तिला काहीतरी वेगळे करावे असे वाटले. अन त्यातून या कल्पनेचा जन्म झाला अन ती आर्थिक स्वायत्त झाली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker