‘येथे’ मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती ; ‘असा’ घ्या फायदा

MhLive24 टीम , 25 जुलै  2020 :- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा मानस जाहीर केला आहे.

याची अंमलबजावणी शासन ठामपणे करेल आणि यादृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे दि .१७ जून २०१५ रोजी सर्वांसाठी घरे (नागरी) योजना- प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करण्यात आली. ही योजना दि. २५ जून २०१५ रोजी सुरु करण्यात आली.

* उमंग अॅपवर प्राप्त होईल योजनेची माहिती
आता आपण या सरकारी योजनेबद्दल घरबसल्या माहिती मिळवू शकता.   उमंग अॅपद्वारे आपल्याला पंतप्रधान आवास योजनेबद्दल माहिती मिळू शकेल. आपल्याला या सरकारी अ‍ॅपद्वारे योजनेशी संबंधित प्रत्येक माहिती मिळेल. उगम अॅप इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरही माहिती दिली  आहे.

Advertisement

या योजनेचा अवधी सरकारने वाढवला आहे. क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम ची मुदत ३१  मार्च २०२१ पर्यंत  वाढविली आहे.  घर खरेदीकरणाऱ्यांना सीएलएसएस किंवा क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते. ही सबसिडी 2.67 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.

* अॅपद्वारे चेक करा अपडेट
तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनाच्या अंतर्गत घेतलेले कर्ज आणि सबसिडी याची माहिती पाहिजे असेल तर  उमंग अॅप वर ‘सीएलएसएस सबसिडी कॅल्क्युलेटर’ ह्या फीचरचा उपयोग करावा लागेल. याशिवाय   ‘अबाउट पीएमजेएवाई’ वर क्लिक करून प्रधान मंत्री आवास योजनाविषयी अधिक माहिती प्राप्त करू शकता

* अशा आहेत कॅटेगिरी  
ही स्कीम देण्यासाठी ४ कॅटेगिरी बनवल्या आहेत.
१) कोनॉमिकली वीकर सेक्शन (ईडब्‍लूएस): ३ ते ६ लाख उत्पन्न
२) लोअर इनकम ग्रुप (एलआईजी ): 6 ते  12 लाख उत्पन्न
३) लोअर इनकम ग्रुप (एलआईजी ):   6 ते  12 लाख उत्पन्न
४) मिडिल इनकम ग्रुप 2 (एमआईजी2):12 ते  १८  लाख उत्पन्न

Advertisement

*  प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या सबसिडीबाबत अशी माहिती चेक करा
https://pmaymis.gov.in या संकेतस्थळावर जा. किंवा  https://pmaymis.gov.in/Open/Find_Beneficiary_Details.aspx  या  लिंक पर क्लिक करून में मेनूमध्ये जाऊ शकता.   त्यानंतर Search Beneficiary वर  क्लिक करा. येथे  आधार नंबर व अन्य माहिती भरा. तुम्हाला तुमच्या संदर्भात सर्व माहिती मिळून जाईल.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker