कोरोनाबळीमध्येही भारताचा विक्रम; पोहोचले ‘इतक्या’स्थानावर

MhLive24 टीम , 25 जुलै  2020 :- कोरोनाने भारतात धुमाकूळ घातला आहे. भारतात संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे.भारत कोरोनारुग्ण संख्येबाबत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. परंतु आता कोरोनामुळे मृत झालेल्या संख्येबाबतही भारत सहाव्या क्रमांकावर गेला आहे.

वर्लोडमीटरच्या माहितीप्रमाणे भारतात आतापर्यंत ३१ हजार ४०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरात करोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंच्या क्रमवारीत फ्रान्सला मागे टाकून भारत सहाव्या स्थानी आला आहे.

असे असले तरी जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर नीचांकी २.३८ टक्के आहे. १० लाख लोकसंख्येमागे ८६४ लोकांना करोनाची बाधा झाली असून २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

Advertisement

वर्ल्डोमीटरनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात १ कोटी ५९ लाख ३९ हजार १७५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी जगभरात सहा लाख ४२ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker