Powerful womens of india : कधी काळी महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या भारतातील महिला आता जगात शक्तिशाली; जाणून घ्या फोर्ब्सच्या यादीत असणाऱ्या भारतीय महिलांची नवे

MHLive24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्स दरवर्षी जगभरातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते. यामध्ये आता भारतीय महिलांनादेखील स्थान मिळाले आहे. यामध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग तिसऱ्यांदा फोर्ब्स मध्ये 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे.(Powerful womens of india )

यावर्षी निर्मला सीतारामन जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 37 व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी या यादीत निर्मला सीतारामन 41 व्या क्रमांकावर होत्या.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या फोर्ब्सच्या या यादीत अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांच्यापेक्षा 2 स्थानाने पुढे आहेत. फॉर्च्युन इंडियाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या पॉवरफुल महिलांच्या यादीतही अर्थमंत्र्यांना प्रथम स्थान देण्यात आले.

Advertisement

अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्स दरवर्षी जगभरातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते. फोर्ब्सच्या यंदाच्या यादीत 40 सीईओंव्यतिरिक्त जगभरातील 19 महिला नेत्यांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या क्रमांकावर होत्या, मात्र यावेळी मॅकेन्झी स्कॉट यांना पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.

स्कॉट जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉन ग्रुपचे मालक जेफ बेझोस यांची माजी पत्नी आहे. 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आहेत. या यादीत युरोपीयन सेंट्रल बँकेचे अध्यक्ष क्रिस्टिन लगार्ड हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

फोर्ब्सच्या या यादीत इतर भारतीयांवर नजर टाकल्यास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत एचसीएल कॉर्पोरेशनच्या रोशनी नाडर देखील आहेत. या यादीत रोशनी यांना 52 वे स्थान मिळाले आहे. याशिवाय, बायोकॉनचे किरण मुझुमदार शॉ 72 व्या स्थानावर आहेत आणि फाल्गुनी नायर, संस्थापक आणि सीईओ, Nykaa यांना यादीत 88 वे स्थान मिळाले आहे.

Advertisement

या वर्षी, जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या 18 व्या वार्षिक यादीमध्ये अशा 40 महिलांचा समावेश आहे, ज्या कोणत्या ना कोणत्या कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत आहेत. फोर्ब्सच्या यादीत 19 जागतिक नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker