भारतीय विद्यार्थ्याची चीनमध्ये निर्घृण हत्या! वाचा नेमके काय घडले?

MHLive24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- चीनमध्ये व्यावसायिक अभ्यासक’म शिकण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूचे वार केल्याच्या खुणा आढळल्या असून चीनमध्येच करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून ही बाब उघड झाली आहे. मात्र, चीनकडून आता याबाबतचा अहवाल देण्यात टाळाटाळ होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

बिहारच्या गयामध्ये राहणारा विद्यार्थी नागसेन अमन चीनमधील विद्यापीठात व्यावसायिक शिक्षण घेत होता. त्चाच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याचा मृतदेह विद्यापीठातील शयनगृहात कित्येक दिवस पडून होता. कुणालाही त्याचा पत्ता लागला नाही. काही दिवसांनी जेव्हा हा मृतदेह सडू लागला, तेव्हा त्याची दुर्गंधी विद्यापीठात पसरायला सुरुवात झाली. त्यामुळेच या हत्येचा उलगडा झाला.

चीनमध्येच शवविच्छेदन चीनमध्येच अमनच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी सिद्धार्थ जुमरानी याच्या उपस्थितीत शवविच्छेदन करायला अमनच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली होती.

Advertisement

सिद्धार्थने दिलेल्या माहितीनुसार अमनच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. चीनकडून शवविच्छेदन होईपर्यंत तत्परता दाखवण्यात आली. मात्र, त्यानंतर कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. शवविच्छेदन अहवाल देण्यापासून ते अमनचे पार्थिव पाठवण्यापर्यंत कुठल्याच बाबतीत चीनकडून प्रतिसाद येत नव्हता.

त्यानंतर भारत सरकारने मध्यस्थी केल्यानंतर चीन सरकारकडून हालचाली करण्यात आल्या आहेत. नागसेन अमन याचा मृतदेह आता 11 ऑगस्टला भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याची कल्पना अमनच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून भारताच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी या प्रकरणी पाठपुरावा करीत आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker