Indian Economy : मागिल दोन वर्षापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था काही प्रमाणात रुळावर होती. सरकारची विविध धोरणे तसेच योजना अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी फायद्याच्या ठरल्या होत्या.

दरम्यान कोरोनाच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले . भारतीय अर्थव्यवस्था मोठया प्रमाणावर ढासळली.

वास्तविक कोरोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला असा धक्का दिला आहे की, त्यातून सावरण्यासाठी 12 वर्षे लागतील. सेंट्रल रिझर्व्ह बँकेच्या संशोधन पथकाच्या अहवालात असे म्हटले आहे.

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. RBI च्या 2021-22 या आर्थिक वर्षातील चलन आणि वित्तविषयक अहवालात असेही म्हटले आहे

की, चलन आणि वित्तीय धोरणामध्ये नियतकालिक समतोल राखणे हे स्थिर वाढीच्या दिशेने पहिले पाऊल असावे. मात्र, केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे की, हा अहवाल स्वतःचे मत नसून ज्या लोकांनी हा अहवाल तयार केला त्यांची मते आहेत.

अनेक सूचना प्राप्त झाल्या : या अहवालात अनेक संरचनात्मक सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये कमी किमतीच्या जमिनीवर मुकदमाविना प्रवेश वाढवणे, शिक्षण आणि आरोग्यावर सार्वजनिक खर्च वाढवणे आणि स्किल इंडिया मिशनद्वारे कामगारांची गुणवत्ता सुधारणे या सूचनांचा समावेश आहे.

अहवालानुसार, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आर्थिक पुनरुज्जीवनाचा वेगही मंदावला आहे. युद्धामुळे वस्तूंच्या किमती वाढणे, जागतिक आर्थिक दृष्टीकोन कमकुवत होणे आणि गंभीर जागतिक आर्थिक परिस्थिती यामुळेही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अशा अडचणींचा सामना करण्यासलसाठी तसेच भविष्यात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करण्यासाठी भारत सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे ठरणार आहे. यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे.