Indian Currency
Indian Currency

MHLive24 टीम, 21 मार्च 2022 :- Indian Currency : पैसे म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. प्रत्येकाला आयुष्यात भरपूर पैसे हवे असतात. बर आता हे पैसे म्हणजे आयुष्य फक्त छापलेला कागदच की पण तो लोकांना जीवापाड प्रेमळ असतो. पैश्याच्या नोटामध्ये गांधीजींचा फोटो ते कलर, आरबीआय लिहिलेली पट्टी अशा अनेक गोष्टी आहेत.दरम्यान अशातच संसदेत नोटेबाबत वादंग निर्माण होत आहे.

सरकारला संसदेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सरकारच उत्तर हे असे होते, ‘भारतीय चलनावर सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे’.

नेताजींचा फोटो असलेल्या नोटा दिल्या जाणार नाहीत

संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खासदार महेंद्रसिंग सोलंकी यांनी प्रश्न विचारला की सरकार सुभाषचंद्र बोस यांची छायाचित्र असलेली नोट जारी करणार आहे का? जर तुमचे उत्तर होय असेल, तर कधीपासून? आणि ज्या नोटांवर सुभाषचंद्र बोस यांचे चित्र असेल त्या कोणत्या असतील?

त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज सिंह म्हणाले की, सरकारचा असा कोणताही हेतू नाही.

भारतीय चलनावर महात्मा गांधींचे चित्र

भारतीय चलनावर फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची छायाचित्रे छापली जातात. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, महात्मा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींचे फोटो असलेल्या नोटा छापण्यात आल्या आहेत.

महात्मा गांधींचे चित्र असलेल्या 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. या नोटांमध्ये महात्मा गांधी यांना सेवाग्राममध्ये दाखवण्यात आले होते. एक रुपयाच्या नोटेमध्ये त्यांचे जवळचे छायाचित्र छापण्यात आले होते. हे 1987 मध्ये पहिल्यांदा घडले होते जेव्हा 500 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले होते. यानंतर 9 ऑक्टोबर 2000 रोजी आरबीआयने महात्मा गांधींच्या फोटोसह 1000 रुपयांच्या नोटा जारी केल्या.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit